तेली समाजाचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडविणार - ना.विजय वडेट्टीवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

तेली समाजाचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडविणार - ना.विजय वडेट्टीवार

 तेली समाजाचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडविणार - ना.विजय वडेट्टीवार

तेली समाजाच्यावतीने ना.वडेट्टीवार यांचा सत्कार


नगर -
तेली समाजाचे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे तेली समाजाचे कार्य सुरु आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेचे पदाधिकारी नगर जिल्ह्यात संघटन करुन समाजाच्या उन्नत्तीसाठी विविध समाजपयोगी कार्य करीत आहेत. तैलिक संघटनेचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी तेली समाजाचे अनेक वर्षांपासून असलेले प्रलंबित प्रश्‍न निवेदनाद्वारे मांडले आहेत. तेली समाजाचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडविणार, असे प्रतिपादन बहुजन विकास, मदत, पुनर्वसन राज्य (ओबीसी) मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.

     नगरमधील दाळ मंडई येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तेली पंचाचा वाडा येथे मंत्री ना.वडेट्टीवार यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, शहराध्यक्ष रमेश साळूंके, कृष्णकांत साळूंके, सचिव विजय दळवी, महाराष्ट्र ओबीसी आयोग सदस्य प्रा.डॉ.भुषण कर्डिले, उपाध्यक्ष सचिन म्हस्के, डॉ.कृष्णकांत दारुणकर, डॉ.शरदराव महाले, दिलीप साळूंके, प्रकाश सैंदर, प्रा.श्रीकांत सोनटक्के, दत्तात्रय करपे, अर्जुनराव देवकर, रमेश गवळी, नाशिक विभागीय महिला अध्यक्षा सौ.विद्याताई करपे,  सौ.निताताई लोखंडे, अशोक डोळसे आदि उपस्थित होते.

     ना.वडेट्टीवार पुढे बोलतांना म्हणाले, तेली समाज हा पूर्वीपासून लाकडी घाण्याचे तेल निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. ते तेल शरीरास आरोग्यदायी आहे,  त्यामुळे पूर्वी आजाराचे प्रमाण नव्हतेच, आजचे बाजारातील तेल शरीराला घातक आहेत. जुने पारंपारिक व्यवसायांना गती मिळावी. तरुणांना, महिलांना व पुरुषांना रोजगार मिळावा व्यवसायासाठी करण्यासाठी उद्योगाकरिता महामंडळाने शिफारस करुन कर्ज सुविधा देऊन व्यवसायाला गती द्यावी, यासाठी प्रयत्नशील आहे.

     याप्रसंगी हरिभाऊ डोळसे म्हणाले की, तेली समाजामध्ये पारंपरागत असलेला व्यवसाय जागतिक स्पर्धेमुळे अडचणीत आला आहे. तरुण बेजरोजगार झाले आहेत. तसेच समाजाच्या उन्नत्तीसाठी शासन दरबारी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अनेक वर्षापासून पोलिस भरती, बँक भरती, एमपीएससी, युपीएससीची सर्व प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे. ही प्रक्रीया लवकरच सुरु व्हावी. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहेत. घरापासून शहरात राहण्यासाठी त्यांना 7 हजार रुपये प्रतिमहिना खर्च आहे. यासाठी सरकारने विचार करावा व निर्णय घ्यावा. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे लोटले तरी तेली समाजाला राजकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळाले नाही. तेली समाजातील बौद्धीक गुणसंपन्नता, विचार, धार्मिक, सामाजिक, लोकहिताची जाणिव लक्षात घेऊन राजकीय क्षेत्रात तेली समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.

     यावेळी ना.वडेट्टीवार यांना प्रांतिक तैलीक संघटनेच्यावतीने नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी तेली समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.तसेच ना.वडेट्टीवार यांचा सत्कार तेली समाजाच्यावतीने करण्यात आला. यावेळी अनिल सैंदर, गोरख व्यवहारे, लक्ष्मण देवकर, परसराम सैंदर, संतोष दिवटे, श्रीराम हजारे, गोकूळ शिंदे, गणेश हजारे, देवीदास ढवळे,गोकुळ कोटकर,प्रसाद शिंदे, किसन क्षीरसागर, रामदास क्षीरसागर, बाबासाहेब दिवटे, पवन साळूंके,बंडोपंत शिंदे, शिवदास चोथे, देवीदास साळूंके, सागर काळे, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, सचिन शेंदूरकर, गोकूळ बोकेफोड, रावसाहेब देशमाने, सौ.केदारेताई,  शशिकांत देवकर, नितीन फल्ले आदिंसह तेली समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment