श्रीराम मंदिर निर्माण निधी साठी कार्यालयाचे उदघाटन ३० डिसेंबर रोजी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

श्रीराम मंदिर निर्माण निधी साठी कार्यालयाचे उदघाटन ३० डिसेंबर रोजी

 श्रीराम मंदिर निर्माण निधी साठी कार्यालयाचे उदघाटन ३० डिसेंबर रोजी

नगर - श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे श्रीराम मंदिर निर्माण निधी अभियान सम्पूर्ण भारतभर सुरु होत आहेत.आपल्या जिल्ह्यात हे अभियान दोन टप्प्यात होत आहे.या अभियानात समाजातील सर्व घटकांकडून घरोघरी जाऊन हा समर्पण निधी गोळा करण्यात येणार आहे. हे अभियान श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कार्यकर्ते समाजातील सर्व सज्जन शक्ती ,सर्व पंथ,संप्रदाय, धर्माचार्य यांच्या सहकार्याने करणार आहे.१ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत श्रीराम मंदिर निधी अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे.या निधी संकलनाचे कार्यलयाचे उदघाटन गौरी घुमट येथील राष्ट्र हित संवर्धक मंडळ (ट्रस्ट )येथे  बुधवार दि .३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.तरी सर्व समाजातील श्री रामभक्तानी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वहिंदूपरिषदेचे जिल्हा  मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment