शहर बँकेच्या सीबीएस प्रणाली कार्यशाळेचे उदघाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 13, 2020

शहर बँकेच्या सीबीएस प्रणाली कार्यशाळेचे उदघाटन

 सहकारी बँकांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा :

चेअरमन सुभाष गुंदेचा

शहर बँकेच्या सीबीएस प्रणाली कार्यशाळेचे उदघाटन 
नगरी दवंडी

अहमदनगर : देशात राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच खाजगी बँकांच्या प्रवेशामुळे बँकींग क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असून प्रचंड स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दैनंदिन कामकाजात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढला तरच सहकारी बँका टिकू शकतील. त्यामुळे काळाची पावले ओळखत शहर सहकारी बँकेने सीबीएस सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब करण्याचे ठरविले असून बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालीच्या वापराबाबत  कार्यशाळेचे उद्घाटन  चेअरमन सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी श्री गुंदेचा म्हणाले की, कोअर बँकींग सिस्टीम (सीबीएस) सॉफ्टवेअर प्रणालीमुळे बँकेचे दैनंदीन कामकाज गतिमान होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जलद बँकींग सुविधांचा लाभ घेता येणार आहे.


आज सर्व क्षेत्रांत प्रचंड स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे, त्यातून व्यवसायात उत्कर्ष साधता येतो. 

यावेळी बँकेच्या आयटी कमिटीचे चेअरमन, संचालक सीए गिरीश घैसास, डॉ. विजय भंडारी, सीए सुनिल फळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वीर खान,   कार्यशाळेचे प्रशिक्षक संजीव कुलकर्णी, जॉईंट मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर कुलकर्णी, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया, कामगार प्रतिनीधी संजय मुळे, सुनिल निंबाळकर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संचालक गिरीश घैसास म्हणाले की, बँकींग क्षेत्रात ज्या ज्या वेळी नवीन तंत्रज्ञान आले, त्या त्या वेळी सहकारी बँकांमध्ये सर्व प्रथम शहर बँकेने त्याचा अवलंब करुन आपल्या कामकाजात गतिमानता आणलेली आहे. कोअर बँकींग सिस्टीम ( सीबीएस ) प्रणालीची अधिकारी व कर्मचारी यांना माहीती व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी श्री घैसास यांनी सांगितले.

संजीव कुलकर्णी यांनी सीबीएस सॉफ्टवेअर वापराबाबत उपस्थितांना सविस्तर माहीती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here