मिरी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

मिरी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

 मिरी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न



नगरी दवंडी

मिरी: पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था तसेच पुणे येथील के.के.बुद्रानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने १८६ वे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शनिवारी यशस्वीरित्या मिरी येथे संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन मिरी येथील दै. पुढारीचे युवा पत्रकार सचिन नन्नवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

      या शिबिरात सुमारे ८५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून यातील सुमारे २२ रुग्णांवर पुणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव वेताळ मेजर यांनी दिली आहे.

     यावेळी शिबिरात सहभाग घेतलेल्या रुग्णांची डॉ.बबन शेळके तसेच डॉ.मनीषा कोरडे यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून युवा उद्योजक शुभम डहाळे,शशिकांत झाडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष असलेल्या शिवाजी वेताळ यांनी कोरोनाच्या संकट काळात गोरगरीब वृद्धांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून मदतीचा हात दिला असून सुमारे अठरा वर्षांपासून ते या मोतीबिंदू शिबिरांचे आयोजन करून गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्याचे मौलिक काम करत आहेत.यासाठी त्यांना पत्नी सौ.अनिता शिवाजी वेताळ यांची मोलाची साथ मिळत आहे.

No comments:

Post a Comment