राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य उल्लेखनीय- पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य उल्लेखनीय- पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

 राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य उल्लेखनीय- पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाडनगरी दवंडी


जामखेड -

सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवडा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या पंधरवडा समारोप वेळी रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये जामखेडचे नूतन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते एनसीसी विद्यार्थ्यांचे ए प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जामखेडचे कर्तव्यदक्ष नूतन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड ,नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश चिटणीस राजेंद्र कोठारी, विठ्ठल राऊत ,प्राचार्य हरिभाऊ ढवळे, प्रा.रमेश बोलभट, प्रकाश तांबे ,दत्तात्रय ढाळे, राहुल आहिरे, सुदाम वराट ,पप्पूभाई सय्यद एनसीसी ऑफिसर मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला व सर्व एनसीसी कॅडेट चे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविका मध्ये  प्राचार्य ढवळे यांनी विद्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण कार्याची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी बोलतांना असे सांगितले की एनसीसी मुळे शिस्तबद्ध, चारित्र्यसंपन्न ,देशभक्त नागरिक घडण्यास मदत होते व संरक्षण दलात एनसीसी कॅडेट उत्कृष्ट कामगिरी करतात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये शिस्त-जिद्द-चिकाटी  महत्वाची आहे. अभ्यासात सातत्य ठेवावे. स्पर्धापरीक्षांमध्ये सहभाग घ्यावा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र वाचावे मी रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे.

जामखेड मध्ये विद्यार्थिनींसाठी वेगळे सुरक्षा पथक निर्माण केले आहे. त्यामुळे शालेय आवारात फिरणाऱ्या तळीरामांचा कडक बंदोबस्त होणार आहे. विद्यार्थिनींना काही अडचण असेल तर आम्हाला संपर्क साधावा  असे मत व्यक्त केले.व एनसीसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मा राजेंद्र कोठारी यांनी एनसीसी कॅडेट व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले.मा हरिभाऊ बेलेकर यांनी विद्यालयांमध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत यांचे कार्य उल्लेखनीय आहे व सर्व टीम चांगले कार्य करते.मा विठ्ठल आण्णा राऊत यांनी गायकवाड साहेबांनी पुन्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयात यावे अशी विनंती करून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सूत्रसंचालन रमेश बोलभट आभार एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी मानले.

No comments:

Post a Comment