बेकायदा तलवारी बाळगणार्‍या इसमावर गुन्हा दाखल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

बेकायदा तलवारी बाळगणार्‍या इसमावर गुन्हा दाखल..

 बेकायदा तलवारी बाळगणार्‍या इसमावर गुन्हा दाखल..


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः बेकायदेशीररित्या वाहनात तलवारी घेवून फिरणार्‍या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेकडून भारतीय हत्यार कायदा कलम 4/24 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 तलवारीसह 6,53,800 रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
    सदर घटनेची हकीकत अशी की अशोक राळेभात.रा. रत्नापूर ता. जामखेड हे इंडिगा कार (चक 04-गइ -3750) दिल्लीगेट वरून सिविल हॉस्पिटल मध्ये जात असताना निलक्रांती चौकात संशय आल्याने थांबवले असता कार मध्ये ड्रायव्हर सीटच्यामागे पांढर्‍या रंगाच्या गोणीमध्ये 3,800 रू. किमतीच्या चार धारदार तलवारी आढळून आल्या. गुन्हे शाखा पोलिसांनी गुन्हा दाखल करून राळेभात यांना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ/ संदीप घोडके, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरुंद, पोना/दिनेश मोरे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, मयूर गायकवाड, जालिंदर माने, विजय धनेधर, सागर सुलाने यांनी या कार्यवाहीत भाग घेतला.
    ही कामगिरी मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अगरवाल,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. विशाल ढुमे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment