या शहरातील पुरातन बारव,विहीर व मंदिराची विशेषज्ञां कडून पाहणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

या शहरातील पुरातन बारव,विहीर व मंदिराची विशेषज्ञां कडून पाहणी

 या शहरातील पुरातन बारव,विहीर व मंदिराची विशेषज्ञां कडून पाहणी



नगरी दवंडी

कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत शहरातील ऐतिहासिक वारसाच्या साक्षीदार असलेल्या पुरातन विहीरी तसेच काही पुरातन वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने आ. रोहित पवार यांनी रायगड विकास प्राधिकरणामध्ये रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि पूनरूजीवनाचे काम करणारे प्रा. वरून भामरे यांच्या टीमला याबाबत आराखडा बनविण्याबाबत चर्चा केली होती त्यानुसार यात टीमने आज पाहणी केली. 


              कर्जत शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या आकर्षक बारवाकडे लक्ष द्यावे व त्याचे पुनरुज्जीवन करावे अशी कल्पना भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा यांनी मांडली होती. त्याच्या या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत नगर पंचायत च्या वतिने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पाहणी केली, सदर बाब आ रोहित पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या विषयातील तज्ञ व्यक्तींना काम करण्याबाबत चर्चा केली त्वरित याचा आराखडा बनविण्याबाबत सूचना दिल्या. आज या टीमने कर्जत शहरातील विविध ठिकाणावरील पाच बारवा व विहिरी तसेच तीन पुरातन मंदिरे यांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये वीरशैव लिंगायत समाज मठातील महादेव मंदिराजवळील बारव, राशीन बारव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील आड, नागेश्वर मंदिर परिसरातील कुंड, काळा महादेव मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, व तोरडमल तालमी शेजारील आड इ. ची फिरून पाहणी केली. वरून भामरे यांच्या टीमचे वास्तू विशारद प्रवीण वाघमारे व त्याचे सहकारी यांनी हा प्राथमिक अभ्यास करून या वास्तूची मापे घेऊन प्रकल्प अहवाल करावयाचे काम सुरू केले आहे.

या विविध ऐतिहासिक वास्तूंचा शास्त्रीय अभ्यास करून केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या सह काम करून सदर ऐतिहासिक वारसा पुन्हा नव्याने पुनरुज्जीवित करण्याचा व त्याच्या माध्यमातून शहरातील पर्यटनामध्ये वाढ करण्याचा हेतू या अभ्यासामध्ये आहे. प्राध्यापक वरून भामरे  यांनी नुकतेच रायगडावरील हत्ती तलावाचे यशस्वी पुनरुज्जीवन केले आहे. या क्षेत्रातील त्यांचा प्रचंड अनुभव पाहता त्यांचा अभ्यास कर्जत शहरासाठी व शहरातील वारशाच्या जतनासाठी उपयोगी पडणार आहे. या टीम बरोबर कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा, भीमाशंकर पखाले यांनी या  फिरून या सर्व ऐतिहासिक बाबीची पाहणी केली व प्राथमिक माहिती दिली. सदर ऐतिहासिक बारवा वा मंदिराबाबत कोणाकडे पुरातन संदर्भ, माहिती फोटो असतील तर ते नगर पंचायत ला द्यावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment