शिक्षक बँकेची निवडणूक संयमाने लढा : कळमकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

शिक्षक बँकेची निवडणूक संयमाने लढा : कळमकर

 शिक्षक बँकेची निवडणूक संयमाने लढा : कळमकर

गुरुकुलचा मेळावा संपन्न ...



श्रीगोंदा प्रतिनिधी : 

शिक्षक बँकेची निवडणूक लढवताना समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कलुषित होणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला शिक्षकनेते व साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी कार्यकर्त्यांना श्रीगोंदा तालुका गुरुकुल व शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना दिला . अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते रामदास भापकर होते.

           शिक्षक बँकेच्या निवडणुकीकडे समाजाचे बारीक लक्ष असते. याची जाणीव सर्वांनीच ठेवणे आवश्यक आहे . गुरुकुलने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबरोबर विद्यार्थी व समाजघटकांसाठी विधायक उपक्रम राबवले आहेत. अभिमानाने सांगण्यासारख्या गुरुकुलकडे अनेक गोष्टी आहेत इतरांचे दोष दाखवण्यापेक्षा त्या चांगल्या गोष्टी सभासदांना सांगा. काही स्वयंभू शिक्षकनेते व बीनचेहऱ्याची मंडळे बँकेची सत्ता मिळवण्यासाठी बेचैन झाले आहेत त्यांच्यापासून सावध रहा असे बोलताना कळमकर यांनी सांगितले. रा.या.औटी यांनी बोलताना सांगितले की गुरुकुलने बँकेत सभासदहिताचा कारभार केला असून ही बाब सभासदांच्या लक्षात आल्याने आता गुरुकुलला बँकेत सत्ता मिळवण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही. संजय धामणे म्हणाले गुरुकुलने समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास प्राध्यान्य दिले. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त गुरुकुलमध्ये आहे. यावेळी नितिन काकडे , भास्कर नरसाळे , दशरथ देशमुख , उत्तम पवार , विजय महामुनी , मधुकर रसाळ , मिलिंद पोटे , भाऊसाहेब नगरे , राम ढवळे , अशोक घालमे , विजय जाधव आदि उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी मिलिंद पोटे , दतात्रय शिंदे , शिवाजी रायकर , सुभाष यादव , प्रवीण गांगार्डे , अंकुश बेलोटे , बाळासाहेब अनपट , शुभांगी ईश्वरे , रावसाहेब दरेकर , महादेव खेतमाळस , जावेद सय्यद , दिलीप रासकर , संतोष शिंदे , बिभिशन हराळ , सुरेंद्र हातवळणे , सुरेश हराळ , दादासाहेब चोभे , संगीता भापकर , संगीता पवार , कैलास ठाणगे , लक्ष्मण शेंडगे आदींनी परिश्रम घेतले. 


No comments:

Post a Comment