कल्याण रोड - गणेशनगर भागाचा विकास अनुशेष भरुन काढणार : माजी उपमहापौर अनिल बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

कल्याण रोड - गणेशनगर भागाचा विकास अनुशेष भरुन काढणार : माजी उपमहापौर अनिल बोरुडे

 कल्याण रोड - गणेशनगर भागाचा विकास अनुशेष भरुन काढणार : माजी उपमहापौर अनिल बोरुडेनगरी दवंडी

अहमदनगर : कल्याण रोड परिसर नगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग असल्याने येथे नागरी वसाहती झपाटयाने वाढत आहेत. नव्याने परिसर विकसीत होत असल्याने मुलभूत सोयी सुविधांपासुन या भागात विकास कामांचे नियोजन करावे लागत आहे. परिसराच्या  सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार केलेला असून निधीच्या उपलब्धतेनुसार विकास कामांचा अनुशेष भरुन काढणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी केले.गणेशनगर परिसरातील ४५० एम एम व्यासाची व  ४२ लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटार कामाच्या शुभारंभ प्रसंगी श्री बोरुडे बोलत होते.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून  या भागात अडीच कोटींची विकास कामे मंजूर असून त्यातून भरीव विकास कामे होऊन परिसराचा कायापालट होणार  आहे.  राज्यशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे भरीव निधी प्राप्त झाला आहे. अमृत पाणी योजनेचे काम अंतीम टप्प्यात आले असून लवकरच बालिकाश्रम रोड, कल्याण रोड परिसराचा पाणी प्रश्न सुटणार आहे. मी नगरसेवक असतांना बालिकाश्रम परिसराचा विकास कामांतून कायापालट केला आहे. निवडणुकीच्या वेळी कल्याण रोड परिसरातील नागरिकांना विकास कामांचा शब्द आम्ही सर्व नगरसेवकांनी दिला होता. त्याची वचनपूर्ती आम्ही आता करत आहोत.

नगरसेवक शाम (आप्पा) नळकांडे म्हणाले की, कल्याण रोड परिसरात भरीव विकास कामांच्या माध्यमातून नंदनवन उभे करण्याचा आमचा मानस आहे. गणेशनगर - कल्याण रोड परिसरात ड्रेनेज लाईनची सुविधा नसल्याने पावसाच्या व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यामुळे या कामास प्राधान्य देऊन आज हे काम मार्गी लावत आहोत. या भागात सर्वसामान्य जनता राहत आहे.  लवकरच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहोत. परिसरात सर्व उद्यान भूखंड विकसीत करण्यासाठी नियोजन असून यासाठी निधी उपलब्ध झाला असून तेही काम लवकरच सुरु होणार आहे.यावेळी नगरसेवक अप्पा नळकांडे, संजय शेंडगे, नगरसेविका पुष्पा अनिल बोरुडे, रोहीणी संजय शेंडगे, सचिन शिंदे, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, सोसायटीचे चेअरमन गणेश शिंदे, अनिल राऊत, शंकर गायकवाड, साळवे सर, नानाभाऊ देवतरसे, राजू तेल्ला, पोपट रासकर, बाळासाहेब डागवाले, सुरेश मिसाळ, विमल जगताप, अमोल भांबरकर, सुबोध कुलकर्णी, गणेश यंचिकटला, साधना गरड, मिनाज शेख, विजया जंगम, महेश रसाळ, सदाशिव शिंदे, संतोष लयचेट्टी आदी उपास्थित होते.

No comments:

Post a Comment