वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज ः डोंगरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज ः डोंगरे

 वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज ः डोंगरे

निमगाव वाघा येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व स्पर्धा परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्याकरिता निमगाव वाघा (ता. नगर) येथे धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयास साहित्यिक मिराबक्ष खुदाबक्ष शेख (बागवान) (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) यांनी पुस्तकांची भेट दिली. या पुस्तकांचा स्विकार वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी स्विकार केला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्मार्ट फोन हातात आल्याने ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी वाचनापासून दुरावत आहे. वाचनाने उद्याच्या पिढीचे उज्वल भवितव्य घडणार आहे. या भावनेने गावात वाचनालय सुरु करण्यात आले असून, वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी गावात वाचनालय सुरु करुन विद्यार्थ्यांसह युवक-युवतींना  भविष्य घडविण्यासाठी एकप्रकारे दिशा देण्याचे कार्य केले आहे. वाचनाने विचार समृध्द होत असतात व जीवनाला एक वेगळी दिशा मिळत असते. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरु असलेल्या या चळवळीत पुस्तकांची भेट देऊन खारीचा वाटा उचलला असल्याचे साहित्यिक मिराबक्ष खुदाबक्ष शेख (बागवान) यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment