नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष सुधीर पिसे यांना श्रध्दांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष सुधीर पिसे यांना श्रध्दांजली

 नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष सुधीर पिसे यांना श्रध्दांजली'


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने शहरातील डावरे गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शहर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्रीकांतजी मांढरे, भिंगार शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेशजी धोकटे, शिंदे मळा शिंपी समाजाचे सुरेश लोळगे, सुरेशजी चुटके, कैलास गुजर, ज्ञानेश्वर कविटकर, महेश गिते, दिलीप गिते, विलास गिते आदी समाजबांधव उपस्थित होते.
अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या निधनाने नामदेव शिंपी समाज एक उत्तम व अष्टपैलू व्यक्तीमत्वाला मुकला. त्यांच्या निधनाने समाजाची न भरून येणारी हानी झाली आहे. पिसे कुटुंबीयांच्या दुखात सर्व समाजबांधव सहभागी असल्याचे श्रीकांतजी मांढरे यांनी सांगितले. शैलेशजी धोकटे, कैलास गुजर, ज्ञानेश्वर कविटकर यांनी अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वर्चुअल पध्दतीने त्यांना श्रध्दांजली वाहून शोक सभेत समाजबांधवांनी सहभाग नोंदवला.

No comments:

Post a Comment