राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुधीर शिरसाठ यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुधीर शिरसाठ यांची निवड

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुधीर शिरसाठ यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर चंद्रहास शिरसाठ यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दिदी दुहन यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खा. तथा ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेशप्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे व नाशिक विभागीय अध्यक्ष चिन्मय गाढे यांनी हे नियुक्तीपत्र  सन्मानपूर्वक प्रदान केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दिदी दुहन यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व विभागीय अध्यक्ष उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार,  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्या विकासात भरीव कार्य करावे व पक्ष संघटना मजबूत करावी, असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
इंजि. सुधिर शिरसाठ हे शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी असून त्यांनी मुंबईतील विद्यावर्धिनीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून बी. इ. कॉम्प्युटर ही पदवी मिळवली असून वयाच्या 21 व्या वर्षांपासून त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. दहावी बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन चर्चासत्र, 7 जि. प.शाळेतील विद्यार्थांना जीवनावश्यक वस्तू व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम, मकरसंक्रांतोत्सव, सांगली पूरग्रस्तांना प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन मदत व स्वच्छता मोहिम असे अनेक उपक्रम राबविले.
सुराज्य रूरल डेव्हलपमेंट फौंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपल्या सहकार्‍यांच्या माध्यमातून वडुले खुर्द व पंचक्रोशीतील गावातील जनतेसाठी  ना नफा ना तोटा या तत्वावर कोरोना महामारीच्या संकटात व लॉक डाऊनच्या काळात रास्त दरात किराणा मालाचे वाटप करून सर्व सामान्यांना खर्‍या अर्थाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्यातील हा पहिला यशस्वी प्रयोग ठरला. ऐन पिके बहरत असतांना शेतकर्‍यांना वेळेवर पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध होत नव्हता. अशा परिस्थितीत राज्य स्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तात्काळ संपर्क करून तालुक्यातील अनेक गावांना पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध करून दिला.
खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील गोर गरीब व अल्पभूधारक शेतकर्‍यांना युरिया चे घरपोहोच मोफत वाटप करून नेत्यांचा वाढदिवस साजरा कसा करावा याचा आगळावेगळा आदर्श राज्यात घालून दिला. तर दिवाळीच्या काळात निराधार मुलांना जीवनाश्यक वस्तूंच्या किट चे मोफत वाटप केले. तसेच सांगलीतील पूरग्रस्त भागातील निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.


No comments:

Post a Comment