वाहन खरेदी विक्री संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

वाहन खरेदी विक्री संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीर

 वाहन खरेदी विक्री संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेने एक चांगला विषय घेऊन केलेले संगठन व त्या माध्यमातून सुरु असलेले रक्तदान शिबीर व कोरोना योध्दयांचा सन्मान हे कार्य कौतुकास्पद असून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन आ संग्राम जगताप यांनी केले.
संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन व कोरोना योद्धांचा सन्मान आ जगताप यांचे हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या व्यावसायिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोकळे म्हणाले की, आम्ही राज्यात संगठन तयार केले असून, या माध्यमातून आम्ही सामाजीक बांधीलकीच्या भावनेतून अनेक उपक्रम राबवित आहोत. याचाच एक भाग म्हणून आज हा राज्यव्यापी पहीला मेळावा व सामाजिक उपक्रम घेत आहोत.
यावेळी आ संग्राम जगताप, माजी आ नारायण आबा पाटील,  राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी, जिल्हा उपाध्यक्ष सलिमभाई मुलाणी, नगर शहराध्यक्ष अशोक चोभे, उपाध्यक्ष निजाम शेख, सचिव बाळासाहेब भंडारी, राहुल शिरसाठ, उमेश कोतकर, निखील वारे, अक्षय कर्डिले, बाळासाहेब पवार, योगेश ठुबे, सतिष बारस्कर, शरद बडे, सुरेश बडे, संजय अकोलकर, अंबादास शिरसाठ, बाळकृष्ण भाकरे, हनिफ बागवान, संदीप यादव, गौरव हापसे, संदीप आडसुळ, बबलू शेख, आयाज शेख, हन्नन शेख, सलिम नेवासकर, भैय्या शेख, अहमद मुलाणी, विरेंद्र शेकटकर, आनंद भळगट, तुषार टाक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment