वडार /ओड समाजाच्या प्रदेश कार्यकारिणीची कर्जत येथे बैठक! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

वडार /ओड समाजाच्या प्रदेश कार्यकारिणीची कर्जत येथे बैठक!

वडार /ओड समाजाच्या प्रदेश कार्यकारिणीची कर्जत येथे बैठक!


कर्जत :-
कर्जत जिल्हा अहमदनगर येथे ओसिसिआय (वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया) महाराष्ट्रचे प्रदेश सरचिटणीस गोविंद तांदळे यांच्या संयोजनातुन  प्रदेश कार्यकारिणीची बैठक अतिशय उत्साहात संपन्न झाली.
      राज्य तसेच देशातील उपेक्षित समाज बांधवाना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या ओसिसिआय संघटनेने महाराष्ट्र राज्यात ऐक्याच्या दृष्टीने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. ओसिसिआयचे प्रदेशाध्यक्ष
दिपक पवार यांनी यावेळी विविध पदाधिकाऱ्याच्या निवडी जाहिर केल्या.  यावेळी निवडलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे राज्य उपाध्यक्ष- राज कुसाळकर (ठाणे), हवेली तालुकाध्यक्ष पदी संतोष कुसाळकर यांचे सह कर्जत तालुकाध्यक्ष पदी नितीन नागनाथ जाधव यांची भेट निवड केली करण्यात आली. कर्जत तालुका महिलाध्यक्षा म्हणून सौं. अनुमोवा शरद पिटेकर व कर्जत तालुका कार्याध्यक्ष जानु विटेकर यांची निवड करण्यात आली.
इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष आजिनाथ तांदळे, सुखदेव तांदळे, बापु लष्कर, सुनिल नन्नवरे,  सरचिटणीस म्हणून सागर म्हेत्रे, तर खजिनदार म्हणून संतोष जाधव यांची निवड करण्यात आलेले. याबैठकीत  नुतन प्रदेश उपाध्यक्ष राज कुसाळकर, प्रदेश सरचिटणीस गोविंद तांदळे, प्रदेश संपर्कप्रमूख कृष्णा नलावडे, सोलापूर जिल्हा मार्गदर्शक शामराव नन्नवरेसर यानी मनोगते व्यक्त केली. 
          बैठकीस संपूर्ण महाराष्ट्रातुन पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये राज्य उपाध्यक्ष विष्णू पवार (रत्नागिरी), सौं. लिलाताई लष्करे (मुंबई), प्रियदर्शनी पवार (माढा),  राज्य संपर्क प्रमुख कृष्णा नलवडे (मुंबई),  अर्जुन वडार (वाळवा), नितीन मोहिते, डाॅ. विटकर,  कापसे सर, माने सर,  पोपट तांदळे, मा. सरपंच, संतोष चौगुले, सुभाष चौगुले, सतिश विटेकर, सौ अनिता पवार (कोंडवा, पुणे),  राजू नन्नवरे (नगर), आदी सह अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत शामराव ननवरे सर यानी केले तर आभार गोविंद तांदळे यांनी मानले. कर्जत सारख्या ग्रामीण भागात समाजाची प्रदेशची बैठक आयोजित करून त्याचे अत्यंत चांगले नियोजन केल्या बद्दल अनेकांनी राज्य सरचिटणीस गोविंद तांदळे  यांचे कौतुक केले केले.

No comments:

Post a Comment