दुर्गाव ग्रामपंचायतसाठी रवींद्र भगत व त्याची पत्नी अश्विनी भगत यांनी भरला उमेदवारी अर्ज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

दुर्गाव ग्रामपंचायतसाठी रवींद्र भगत व त्याची पत्नी अश्विनी भगत यांनी भरला उमेदवारी अर्ज

दुर्गाव ग्रामपंचायतसाठी रवींद्र भगत व त्याची पत्नी अश्विनी भगत यांनी भरला अर्ज


कर्जत  :-
दुर्गाव मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 3 अश्विनी  रवींद्र भगत, वार्ड क्र 1 रवींद्र मल्हारी भगत यांनी दुर्गाव येथील ग्राम पंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी परमेश्वर सुद्रीक यांचे कडे उमेदवारी अर्ज सादर केला, दुर्गावच्या विकासासाठी गावातील सत्ताधारीना धारेवर धरून जनतेच्या विकास कामाचा झडा लावणारे व सदैव समाज कार्यात सक्रिय असणारे प्रत्येकाला मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून रवींद्र भगत परिसरात व तालुक्यात प्रचलित असून त्यांनी गावातील अकरा व्यावसाईकाना गाळे बांधून दिले,  गरजूना विविध योजना मिळवून देण्याचा सतत प्रयत्न केला, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सभापती उमेश परहर यांच्या माध्यमातून गावातील दलित लोकांना कडबाकुट्टी मशीन,  पिठाची गिरणी, इले मोटार, शिलाई मशीन, पीको फॉल मशीन व रमाई योजनेतून घरकुले मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याचे रवींद्र भगत यांनी सांगितले, गोर गरीबावर अत्याचार होत असल्यास ते सतत मागे उभे राहतात अशा रवींद्र भगत यांनी दुर्गाव मधून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी स्वतः प्रभाग 1 मधून तर त्याच्या पत्नी अश्विनी  रवींद्र भगत यांनी प्रभाग 3 मधून सर्वसाधारण जागांवर उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे, यावेळी दुर्गाव मधील मुबारक सय्यद,  गणेश कुलथे, शंकर भगत, नाना भगत, आबा कुलथे, रुपचंद पंडित, माजी ग्राम पंचायत सदस्य अनिल भगत , संतोष गोरे, अर्जुन गोरे, अस्लम शेख, धनंजय जायभाय, अक्षय पाटील, परशु भगत, गणेश पंडित, राजू भगत, शिवाजी निकम, आदीसह अनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment