कोरोनाचा ‘नवा व्हायरस’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

कोरोनाचा ‘नवा व्हायरस’

 कोरोनाचा ‘नवा व्हायरस’

ब्रिटन लॉकडाउन, भारत सतर्क,!

नव्या वर्षात लस आल्यानंतर करोनाची संपुष्टात येण्याची आशा असतानाच करोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला असून, त्याच्या प्रसाराचा वेगही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी या विषाणूला ‘ईयुआय’ असे नाव दिले आहे. या नव्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे.

    जगभरात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या 7 कोटी 71 लाखांहून अधिक आहे. त्यामुळे सध्या अनेक देश कोरोना लसीच्या प्रतिक्षित आहेत. कोरोना लसीकरणात जगात ब्रिटनने पहिला नंबर लावला. पण आता ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसने नवे रुप धारण केल्याचे समोर आले आहे. ज्यानंतर ब्रिटन सरकारने देशातील चौथ्या टप्प्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.
‘हा नवा कोरोना व्हायरस खूप भयानक आहे. या व्हायरसचा फैलाव अधिक झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या काही भागात कडक निर्बंध लागू केले आहेत. हा कोरोना व्हायरस ब्रिटनच्या दक्षिण-पूर्व भागात जास्त पसरला आहे.’ या सर्व गोष्टी लक्षात घेऊन युरोपमधील नेदरलँड्स आणि होलँडसारख्या काही देशांनी ब्रिटनहून येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे.
ब्रिटनमध्ये जवळपास 1.6 कोटी लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लंडनमध्ये चौथ्या टप्प्यात निर्बंध लागू केले आहे. आतापर्यंत सर्वात कठीण निर्बंध ब्रिटनच्या सरकारने देशात जारी केले आहेत. यामुळे यंदा ब्रिटनमधील ख्रिसमस आणि नवे वर्षाचे सेलिब्रेशन पहिल्यासारखे करण्यात येणार नाही आहे.
नवा कोरोना व्हायरसने जे काही रुप धारण केले आहे, त्यामुळे निवासी भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांना रेल्वे स्टेशनवर देखील तैनात करण्यात आले असून लोकांना प्रवास करण्यासाठी मनाई केली जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसहित दक्षिण-पूर्व अनेक भागात 30 डिसेंबरपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
    देशात करोनाचा प्रसार कमी होत आहे. दुसरीकडे लवकरच लसही येणार आहे. तीन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. असं असतानाच करोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागला आहे. वेगानं पसरत असलेल्या या करोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलं आहे.
    ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह नेदरलॅड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही करोनाचा नवा प्रकार आढळून आला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. करोनाच्या या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून, आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं एम्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं.
    संयुक्त देखरेख गटाची आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या प्रकाराबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रोडरिको ऑफ्रिन हे सुद्धा संयुक्त देखरेख गटाचे सदस्य आहेत.ेदेशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. अस असली तरीही पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच. युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद ठेवणं आवश्यक आहे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment