सामाजिक कार्यामुळे जीवनात उर्जा मिळते : आ.जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

सामाजिक कार्यामुळे जीवनात उर्जा मिळते : आ.जगताप

 सामाजिक कार्यामुळे जीवनात उर्जा मिळते : आ.जगताप

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्राला संत व थोर पुरुषांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. आजच्या युवकांनी या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे आले पाहिजे. सामाजिक कार्यामुळे वैयक्तीक जीवनात उर्जा मिळत असते, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
    सामाजिक कार्यकर्ते विशाल भिंगारदिवे व किशन गायकवाड यांना सह्याद्री नगरभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आ जगताप पुढे म्हणाले की, युवकांनी आपले शिक्षण, व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यासाठी वेळ द्यावा.
सक्षम युवक हे देशाला प्रगतीकडे नेण्याचे कार्य करत असतात. विशाल भिंगारदीवे व किशन गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सह्याद्री नगर भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी.
    तर समाजातील वंचित घटक व गरजूंना मदतीसाठी कार्य करणार असून त्यासाठी युवकांचे संगठन वाढविणार असल्याचे किशन गायकवाड यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अभियंता परिमल निकम, अंकुश मोहीते, किरण गायकवाड, ऋषि तांबे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment