हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अभिवादन

 हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  राजर्ष शाहु महाराज यांनी आपल्या वडीलांची स्मृतीप्रित्यर्थ नगर येथे 1914 साली छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डींग अहमदनगर या नावानी वस्तीगृह सुरु झाले .त्यातुनच पुढे 1918 जानेवारी रोजी अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाल्या पासून छत्रपती चौथे शिवाजी महाराज व राजश्री शाहु महाराज यांचा शैक्षणिक वारसा जिल्हाभरात जिल्हा मराठा विद्या प्रसारक शैक्षणिक संस्था सक्षणपणे चालवत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांनी केले.
लालटाकी रस्त्यावरील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसमोरील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर 137 व्या स्मृदिनानिमीत्त 25 डिसेंबर 2020 रोजी संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नंदकुमार झावरे, उपाध्याक्ष रामचंद्र दरे, विश्वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, सदस्य दिपक दरे, वसंत कापरे, अरूणा काळे, राहुल झावरे यांच्यासह न्यू आर्टसचे प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे, रेसिडेंन्शिअलचे प्राचार्य अशोक दोडके, छत्रपती इंजिनिअरींगचे प्राचार्य महेश नगरकर, लॉ कॉलेजचे प्राचार्य एम. एम. तांबे, डी.एड.च्या प्राचार्य एस. पी. धिरडे, हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य योगिता साद्रे, नंदकुमार जगताप, व्यस्थापक बबनराव साबळे यांच्यासह उपप्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
खानदेशे पुढे म्हणाले, छत्रपती चौथे शिवाजी महारजांचा कोल्हापूरहून नगरच्या भुईकोट किल्ल्यात हालवले, किल्ल्यात एका इमारतीत एकांतात ठेवून इंग्रज अधिकार्यांनी महाराजांचा मानसिक व शारीरिक छळ केला. यातच 25 डिसेंबर 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी लालटाकी रोडवरील जिल्हा मराठा बोर्डिंग समोरच्या प्रगंणात करण्यात आला. या घटनेला आज 137 वर्ष लोटली आहेत. दरवर्षी संस्थेच्यावतीने 25 डिसेंबरला त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. या समाधी स्थळाजवळच चौथे शिवाजी महारजांच पुर्णाकृती पुतळा उभारला असून समाधी स्थळ सुशोभित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment