युवकांना फक्त कार्यकर्ता बनवून न ठेवता त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत -गजेंद्र राशिनकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

युवकांना फक्त कार्यकर्ता बनवून न ठेवता त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत -गजेंद्र राशिनकर

 सिव्हिल हडकोतील युवकांचा मनसेत प्रवेश

युवकांना फक्त कार्यकर्ता बनवून न ठेवता त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत -गजेंद्र राशिनकर



नगरी दवंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. युवा कार्यकर्ते तथा तांडव ग्रुपचे अध्यक्ष ऋतिक लद्दे आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेत दाखल झाले. जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी युवकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सरचिटणीस नितीन भुतारे, मनसे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विनोद काकडे, महिला जिल्हाध्यक्षा अनिता दिघे, अभिनय गायकवाड, संकेत होशिंग, सतीश वडे आदि उपस्थित होते.

सिव्हिल हडको येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी श्याम निंबाळकर, विकी बरकसे, आनंद शिंदे, अक्षय बरकसे, नईमुद्दीन शेख, सौरव सोनार, धनंजय गायकवाड, विजू ठोंबरे, शुभम नन्नवरे, अनता पालवे, शुभम आव्हाड, अक्षय गायकवाड, मोनू कांडेकर, रेहान शेख, शेखर राशिनकर, वैभव तिजोरी, समीर अत्तर, राहुल कुमार आदि परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गजेंद्र राशिनकर म्हणाले की, पुरोगामी विचाराने मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणात सक्रीय आहे. युवकांना फक्त कार्यकर्ता बनवून न ठेवता त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत आहे. युवकांसह मराठी बांधवांचे प्रश्‍न पक्षाच्या ध्येय धोरणाने सुटणार आहे. घराणेशाहीने बरबटलेल्या राजकारणात मनसे हा पक्ष युवकांना एक उत्तम पर्याय आहे. मराठी अस्मितेसाठी पक्षनिष्ठेने मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करीत आहे. सर्व सामाजाला बरोबर घेऊन मनसेची वाटचाल सुरु असून, युवकांना काम करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिन डफळ म्हणाले की, युवा शक्तीने परिवर्तन शक्य आहे. मात्र इतर पक्षाचे राजकारणी त्यांचा वापर आपल्या आपला हेतू साध्य करण्यासाठी करीत आहे. मनसेत युवकांना एक वेगळी दिशा देऊन त्यांना नेतृत्वाची संधी निर्माण करुन देण्यात आली आहे. पक्षाच्या या धोरणामुळे युवक मनसेकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नितीन भुतारे यांनी युवकांना सामाजिक कार्यासाठी व दीनदुबळ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून ध्येय धोरणानुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Post a Comment