नगरच्या साईबंन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाची सुरवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 13, 2020

नगरच्या साईबंन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाची सुरवात

 नगरच्या साईबंन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाची सुरवात ..जेस्टं समाजसेवक राजाभाऊ भापकर यांच्या हस्ते शुभारंभनगरी दवंडी

अहमदनगर

 ........ साईबंन हे हिरवाईचे नंदनवन असून डॉ प्रकाश व सुधाताई कांकरिया यांनी माळरानावर फुलवले हे कार्य प्रेरणादायी व वंदनीय व अनुकरणीय असल्याचे  प्रतिपादन जेस्टं समाजसेवक राजाभाऊ भापकर( गुंडेगाव) यांनी आज नगर येथे केले.श्री भापकर यांच्या हस्ते श्री साईबाबांची पूजा करून,  बाळ गोपाळ पर्यटकांचे फुलांनी स्वागत करून व हुरडा भट्टीची विधिवत पूजा करून या उपक्रमाची सुरवात  करण्यात आली या प्रसंगी  ते बोलत होते  दशरथजी जावले  गुरुजी .निसर्ग पक्षी मित्र संघटनेचे जिल्हाद्यक्ष जयराम सातपुते,.वनस्पती अभ्यासक अमित गायकवाड ,जैन कॉन्फरेन्स चे राष्ट्रीय महामंत्री सतीश लोढा, महावीर इंटरनॅशनल संघटनेचे राष्ट्रीय उपाद्यक्ष   रमेश बाफना साईबंन ,    चे संचालक डॉ प्रकाश व सुधाताई कांकरिया आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते  श्री भापकर पुढे म्हणाले डॉक्टरकीचा पेशा  सांभाळून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून सुमारे ८० एकरात माळरानावर हजारो वृक्ष फुलवून एक चांगला आदर्श या दांपंत्यांनी समाजासमोर आणला आहे पर्यावरणाचे अतिशय मोलाचे असे कार्य  त्यांनी केले असून .येथे अतिशय प्रसन्न ,अश्या  वातावरणात आलेला पर्यटक रमतो .त्यास मन  शान्ति  मिळते ,विचारात देखील सकारात्मक बदल होतात हा माझा अनुभव आहे यासाठी आपण जरूर साईबंन  ला भेट  द्यावी असे आवाहन केले .डॉ प्रकाश व डॉ  सुद्धा कांकरिया  कांकरिया यांनी पर्यटकांनी .व हुरडा पार्टी साठी येणाऱ्यांनी करोनाच्या  पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे मास्क, स्यानिट्झरचा वापर करावा , सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन करून येथे असलेल्या बोटिंगचा .बैलगाडी सफारीचा ,पपेट शो चा झिप लाईन चा विविध खेळाचा आपण आनंद लुटावा असे आवाहन केले पर्यटक व हुरडा पार्टीसाठी  वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी  ठेवण्यात आली  आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here