शेती विकून पण कर्ज फिटेना त्यामुळे शेतकऱ्याने उचलले हे पाऊल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

शेती विकून पण कर्ज फिटेना त्यामुळे शेतकऱ्याने उचलले हे पाऊल

 शेती विकून पण कर्ज फिटेना त्यामुळे शेतकऱ्याने उचलले हे पाऊल



नगरी दवंडी


अहमदनगर - कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपले जीवन संपविले असल्याची घटना घडली आहे. कैलास रामचंद्र नेमाने (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.दरम्यान हि धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत हद्दीतील कडभनवाडी येथे घडली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील कडभनवाडी ( साकत ) येथील कैलास नेमाने यांच्याकडे दोन एकर जमीन होती.पंधरा दिवसांपुर्वी अर्धा एकर जमीन विकली होती तरीही कर्ज फिटले नव्हते काही कर्ज बॅंकेचे तर काही खाजगी सावकाराचे होते. अशी माहिती नातेवाईकांनी दिली पंधरा दिवसांपुर्वी अर्धा एकर जमीन विकली होती तरीही कर्ज बाकी होते.यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मोठ्या मानसिक तणावाखाली होते. यातच त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची खबर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. नेमाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात आणला होता.

No comments:

Post a Comment