युनियन बँक ऑफ इंडिया व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज वितरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

युनियन बँक ऑफ इंडिया व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज वितरण

 युनियन बँक ऑफ इंडिया व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज वितरण



नगरी दवंडी


 अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालय जवळील युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या क्षेत्रीय कार्यालय व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वितरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात महापालिकेचे उपायुक्त दिनेश सिनारे व युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनिलकुमार जदली यांच्या हस्ते सर्वसामान्य नागरिकांना कर्जाचे वाटप करण्यात आले.

या कर्ज वितरण मेळाव्यात सचिन राऊत, अवधेश ठाकूर, बँकेचे प्रबंधक संदीप वाळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सुनीलकुमार जदली म्हणाले की, कोरोना काळात अनेकांचे रोजगार बुडाले तर काहींच्या नोकर्‍यापण गेल्या. साधन सामुग्री उपलब्ध करुन स्वत:च्या व्यवसाय थाटण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी या योजनेचा फायदा होणार आहे. सध्या बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेऊन सरकारने गोरगरिबांसाठी कर्ज प्रक्रिया चालू केली आहे. हे कर्ज घेऊन पूर्णपणे व्यवस्थित फेड केली असता पुढच्या वेळेस अधिक कर्ज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपा उपायुक्त दिनेश सिनारे यांनी या योजनेचा जास्तीत जास्त गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तर बँकेच्या सर्व पदाधिकार्‍यांना या कर्जाचे वाटप व्यवस्थितपणे करुन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 कार्यक्रमासाठी युनियन बँकेचे क्षेत्रीय उपप्रमुख विजया सारधी, मुख्य प्रबंधक ज्ञानेश्‍वर साळुंखे, मनोज कुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी सदाफळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन शिरसाठ, समीर शेख, मुशीर खान, अच्युत देशमुख यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment