आ.लंकेच्या प्रयत्नांना यश आता पर्यंत इतक्या ग्रामपंचायती बिनविरोध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

आ.लंकेच्या प्रयत्नांना यश आता पर्यंत इतक्या ग्रामपंचायती बिनविरोध

 आ.लंकेच्या प्रयत्नांना यश आता पर्यंत इतक्या ग्रामपंचायती बिनविरोधनगरी दवंडी


अहमदनगर:- राज्यातील मुदत संपणार्‍या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे.त्यामुळे आता गावागावात ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.दरम्यान, आतापर्यंत पारनेर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. मतदारसंघातील निवडणूका बिनविरोध होण्यासाठी आ.लंके यांनी गावे पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. संबंधित गावात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात आधी राळेगणसिद्धी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर लगेचच पानोली व कारेगाव ही गावे बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.आज सकाळी पारनेर तालुक्‍यातील शिरापूर, सारोळा अडवाई, भांडगाव या तिन ग्रामपचायतींबाबत बैठक झाली. या तीनही ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आ.लंके यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment