या गावात २० वर्ष विरोधात आसनारे जुने मित्र एकत्र येत ग्रामपंचायत निवडणूक केली बिनविरोध ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

या गावात २० वर्ष विरोधात आसनारे जुने मित्र एकत्र येत ग्रामपंचायत निवडणूक केली बिनविरोध !

 आ.लंके यांच्या बिनविरोध निवडणूक चळवळीला वाढता प्रतिसाद !

पठारवाडी येथील २० वर्ष विरोधात आसनारे जुने मित्र एकत्र येत ग्रामपंचायत निवडणूक केली बिनविरोध !नगरी दवंडी


पारनेर प्रतिनिधी : 

      ग्रामविकासाचा पाया मजबूत करण्यासाठी  ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम, प्रथमच पारनेर नगर तालुक्यात अनुभवयास मिळत आहे.

      सर्व राजकीय पक्ष पुढारी यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवत गावच्या सार्वभौम विकासासाठी एकत्र यावा या साठी आमदार लंके यांनी विकास कामासाठी पंचवीस लक्ष रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा इतिहास जमा होणार आहे आसे चित्र पहावयास मिळत आहे.

       गावासाठी एकत्र येत एवढा भरीव निधी उपलब्ध करत  गावचा विकास करण्यासाठी झपाटलेल्या गाव पुढारी उद्योजक व सामाजिक संस्थांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला आहे.

       आमदार निलेशजी लंके यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शना खाली सुरू झालेल्या ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक या चळवळीसाठी महाराष्ट्राची ग्रामपंढरी असणारी राळेगण सिद्धी या ग्रामपंचायती पासून बिनविरोध निवडणुकीचे सुरुवात झाली व किमान 40 ते 50 ग्रामपंचायत बिनविरोध करणार व गाव पातळीवरचे हेवेदावे, गट-तट बाजूला ठेवत गावातील तंटे संपवणार हा निर्धार करत आमदार निलेश लंके हे गावोगावी बैठक घेत व सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र बसवत मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करत आहे.

      पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या संकल्पनेतून बिनाविरोध निवडणूक करणे बाबत आमदार निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शना खाली तसेच पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या आशीर्वादाने मंगळवारी   पठारवाडी येथील परंपरागत असणारे जुने मित्र व राजकारणात अनेक वर्षे विरोधात असणारे पठारवाडीचे सरपंच किसनराव सुपेकर व हरिभाऊ पवार हे गावच्या भल्यासाठी व गावातील तंटे मिटविण्या साठी एकत्र येत, पठारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करत ग्रामविकासाची पंढरी असणाऱ्या पारनेर तालुक्यात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीच्या चळवळीत विजयोत्स्थव साजरा करताना दिसुन आले.

यावेळी पठारवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते !

No comments:

Post a Comment