या जिल्ह्यात दरोड्याचे गुन्ह्यात वाढ? विशेष पोलीस पथक स्थापण्याची गरज ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

या जिल्ह्यात दरोड्याचे गुन्ह्यात वाढ? विशेष पोलीस पथक स्थापण्याची गरज !

 या जिल्ह्यात दरोड्याचे गुन्ह्यात वाढ? विशेष पोलीस पथक स्थापण्याची गरज !

उपसभापती नीलम गोर्‍हेंचे नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन...

अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड जिल्ह्यातील दरोडा गुन्ह्यात एकच साम्य..
जमिनीतून सोने काढून देतो.धनलाभ करून देतो अशी फसवणूक करणारे ढोंगी बाबा नगर नाशिक जिल्ह्यात सक्रिय.


अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, महिला अत्याचाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोठेवाडी असो कोपर्डी येथील घटनांचा मागोवा घेतला तर अशा घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस प्रशासनास विशेष प्रयत्न करणे आवश्यक वाटत आहे. दि.20 डिसेंबर, 2020 रोजी पहाटे श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर जिल्ह्यात दरोड्याचं प्रमाण वाढलय.. जमिनीतून सोनं काढून देतो अशी फसवणूक करणार्‍या बुवांचा वावर नाशिक परिसरात वाढलाय.. या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पोलीस पथक स्थापण्याची मागणी. उपसभापती आ. नीलम गोर्‍हे यांनी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात गोर्‍हे यांनी म्हटले आहे की जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करून देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली.अशी अनेक नावे प्रचलित वापरून फसवणूक करणार्‍या गुन्हेगारांना विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसेच असे बुवा महिलांना लवकर जाळ्यात ओढत असतात. त्यातून महिलांवर अत्याचार झालेले प्रकार आपण यापूर्वीदेखील पाहिले आहे. असे असताना या बुवाने महिलांवर देखील अत्याचार केले आहेत का ? यासंदर्भात पोलिसांनी महिलांना आवाहन करावी की या भोंदू व्यक्तीने जर कोणत्या महिलेवर अत्याचार केला असेल तर त्यांनी पोलिसांना संपर्क करावा व त्यांची नावे गुपित ठेवण्यात यावे.
दरोडेखोरीच्या अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी खास विशेष पोलीस पथक स्थापण्यात यावे, या दरोडेखोरांचा सतत वावर हा नाशिक, औरंगाबाद, नगर आणि बीड या जिल्ह्यात सुरू असतो. दरोड्यांच्या घटना भविष्यात घडू नये, दरोडेखोरांचा नायनाट करण्यासाठी नगर दरोडेखोर विरोधी जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाची स्थापन करावी, सदरील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पूर्वीच्या दरोड्यांच्या घटनांत आणि या घटनेत काय साम्य आहे याचा अभ्यास करावा जेणेकरून दरोड्यांच्या कार्यपद्धती वरून आरोपींना अटक
करण्यात मदत होईल. दरोडेखोरांकडून गावाशेजारील वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे . अशा वत्यांना गावाशी अथवा पोलिस स्थानकाशी जोडण्यासाठी विशेष उपयोजना करण्यात याव्यात. समाजकंटक, दरोडेखोर यांना संरक्षण देणार्‍या काही प्रवृत्ती सदरील जिल्ह्यात आहेत. दरोडेखोरांच्या मुळाशी जाऊन अशा समाजकंटकांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment