बाजार समितीचे बंद गेट तात्काळ उघडण्याच्या सूचना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

बाजार समितीचे बंद गेट तात्काळ उघडण्याच्या सूचना

 बाजार समितीचे बंद गेट तात्काळ उघडण्याच्या सूचना नगरी दवंडी


 नगर :- गेल्या  तीन वर्षापासून बाजार समितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे, असा आदेश सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा.सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पत्र पाठवून केले आहे, अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिली.

  वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाठवलेले पत्र त्यांना देऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतच्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर रस्ते सुरक्षा समितीची स्वतंत्र बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यापाऱ्यांना दिले.

यावेळी वसंत लोढा म्हणाले, बाजार समितीचे गेटची एक बाजू मागील तीन वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे. सदर गेट बंद असल्याने व्यापारी, नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.  मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे रास्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कडे तक्रार केली असता त्यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधकरिना पत्र देऊन आदेश दिले आहेत. 


    यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील, व्यापारी विपुल शहा, वसंत कापरे, छबुराव हराळ, प्रफुल्ल बांठिया, चिराग शहा, दिलीप गांधी, स्वीय सहायक शिवाजी दिशाकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment