नागवडे' कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांचा मनमानी कारभारास कंटाळून राजीनामा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

नागवडे' कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांचा मनमानी कारभारास कंटाळून राजीनामा

 नागवडे' कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांचा मनमानी कारभारास कंटाळून राजीनामा.



नगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी कारखान्याचे अध्यक्ष भाजपा नेते राजेंद्र नागवडे यांच्या मनमानी आणि गैरकारभाराला कंटाळून आपला राजीनामा कारखान्याचे कार्यकारी संचालक रामचंद्र नाईक यांच्याकडे आज सुपूर्द केला आहे.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विश्वासू आणि जवळचे कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर हे गेली चाळीस वर्षांपासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, बाजारचे अध्यक्ष तसेच कारखान्याचे २० वर्षांपासून संचालक व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. भौगोलिक दृष्ट्या श्रीगोंदा तालुका घोड-कुकडीच्या पाण्याने सुजलाम सुफलाम असतानाही मागील वर्षी कारखाना केवळ नी निवडणूक डोळ्यासमोर बंद ठेवून कोट्यवधी रुपयांचे शेतकरी व कामगारांचे नुकसान केले आहे. तर कारखान्यामध्ये बगॅस, एस एस रॉड, साखर मळी, इथेनॉल, ऊसतोडणी, कामगार,वाहतूक, सहवीजप्रकल्पकारखान्याच्या शिक्षण संस्था यांच्यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष भाजपा नेते राजेंद्र नागवडे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत कुठलेही निर्णय न घेता मनमानी कारभार करत स्वतःच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून कारखाना व स्व. शिवाजीरावबापू यांच्या नावाला कलंक लावून श्रीगोंदा तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना गिळंकृत करण्याचे काम करीत असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे केशवराव मगर म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी 'नागवडे' कारखान्यात छत्रपती शिक्षण संस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करूनहजारो कोटींची माया जमवत परभणी येथे खाजगी साखर कारखाना विकत घेऊन तसेच सांगली येथे स्वतःच्या मालकीचा कारखाना असून नाशिक येथे खाजगी कारखाना विकत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. कारखाना व शिक्षण संस्था यांची चौकशी व्हावी नाही म्हणून ईडीची पीडा मागे लागू नाही म्हणून भाजपात प्रवेश केला असा आरोप करून याबाबत लवकरच नागवडे कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जाहीर सभेत पोलखोल करण्याचा इशारा मगर यांनी दिला आहे.

          कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कारखान्याचे संचालक अण्णासाहेब शेलार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील भोसले, बाजार समितीचे माजी अध्यक्ष वैभव पाचपुते, सुभाष शिंदे, ऍड. बाळासाहेब काकडे आदी उपस्थित होते.

चौकट :

कारखान्याचेे कार्यकारी संचालक रामचंद्र नाईक यांना याबाबत विचारले असता मागील दोन वर्षांपूर्वी अण्णासाहेब शेलार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आज उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी राजीनामा दिला.परंतु बोर्डाच्या बैठकीत कुठलेही निर्णय होत नाहीत. राजीनामे आले ते मंजूर करण्याचे अध्यक्ष ठरवतील. मलाही कुठल्याही कामाबाबत विश्वासात घेतले जात नाही. मला इथे फार त्रास होत आहे मी माझ्या पगाराशी बांधील आहे.

No comments:

Post a Comment