नाशिक पोलिस महानिरीक्षक पथकाचा जुगार अड्डयांवर छापा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 19, 2020

नाशिक पोलिस महानिरीक्षक पथकाचा जुगार अड्डयांवर छापा !

 नाशिक पोलिस महानिरीक्षक पथकाचा जुगार अड्डयांवर छापा !

25 जनांवर गुन्हे दाखल : 4 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील जुगार अड्ड्यांवर गुन्हे अन्वेषन विभागाचे व नगरतालुका पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष झाले असून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर हे मात्र लक्ष घालून जुगार अड्ड्यांवर धाडी टाकत आहेत. दिघावकर यांना जुगारअड्ड्यांची माहिती मिळत असताना नगर गुन्हे अन्वेषन विभाग व नगर तालुका पोलीस ठाणे प्रशासन या कार्यवाहीबाबत मौन का धारण करीत आहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. काल अरणगाव खंडाळाशिव येथे जुगार अड्ड्यावर छापा मारून दिघावकर यांच्या पथकाने 25 जणांवर गुन्हे दाखल करून 4 लाख 55 हजार 160 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

डॉ. प्रतापराव दिघावकर विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैद्य धंदे यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पथकाची नेमणूक केलेल्या पथकाने काल आरणगाव खंडाळा शिव ता.जि. अहमदनगर गावाचे शिवारात जगन्नाथ केरु शिंदे यांचे मालकीचे गट क्रमांक 366 या शेतात असलेल्या पत्र्याचे शेड लगत मोकळ्या जागेत जमिनीवर सतरंजी अंथरून सतरंजीचे आजूबाजूला जमिनीवर बसून काही लोक 52 पत्त्याचा कॅट मधील अंकावर व चित्रावर पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे 25 लोकांना ताब्यात घेण्यात आले.
योगेश माणिक सुपेकर, सागर शिवाजी कोल्हे, जगन्नाथ केरू शिंदे, अल्लाउद्दीन इसाक सेय्यद, महेंद्र शिवानंद भांबळ, विशाल बबनराव चांदणे, विजय बबनराव शिंदे, गोविंद शिवराम शिंदे, दत्तात्रय खुशलचंद गिरमे, हकिल आजीज पठाण, भाऊसाहेब दिलीप तोरडमल, सुनील बंडू शितोळे, राहुल सुदाम गिरे, अनिल रामदास बोठे, अनिल हरिभाऊ दरेकर, दशरथ देवराम कांबळे, भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड, गणेश प्रल्हाद चोंबे, भरत अर्जुन चोंबे, विकास पद्माकर वराडे, शेख लतीफ फत्तुभाई, कैलास मच्छिंद्र लक्षरे, किरण बबन मुके, संतोष दादाभाऊ साबळे, विशाल तुळशीराम थोरात अशा 25 जणांना जुगार खेळताना ताब्यात घेतले असता त्यांचेकडून सुमारे 84,610 /- रुपये रोख रक्कम,3,70,000/- रुपये किमतीच्या मोटार सायकली,550/- रुपये किमतीचे जुगाराची साहित्य साधने असा एकूण 4,55,160/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नगर तालुका पोलीस ठाणे, जि. अहमदनगर येथे भाग 06 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई हि मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. डॉ. प्रतापराव दिघावकर सपो निरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी केली आहे.

No comments:

Post a Comment