आठरा वर्षात सोळाशे कलावंत घडविल्याबद्दल प्रवीण नेटके यांची नेशन प्राईड बुक मध्ये नोंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

आठरा वर्षात सोळाशे कलावंत घडविल्याबद्दल प्रवीण नेटके यांची नेशन प्राईड बुक मध्ये नोंद

आठरा वर्षात सोळाशे कलावंत घडविल्याबद्दल प्रवीण नेटके यांची नेशन प्राईड बुक मध्ये नोंद


अहमदनगर -
येथील कला शिक्षक प्रवीण नेटके यांनी आठरा वर्षात सोळाशे कलावंत घडविल्याबद्दल नेशन प्राईड बुक ऑफ रेकॉर्ड 2020 साठी त्यांची नोंद झाली आहे.
नेटके ड्रॉईंग अकॅडमीच्या माध्यमातून नेटके यांनी चित्रकला क्षेत्रात अनेक उत्कृष्ट कलाकार घडवले आहेत. त्यांना 2001 मध्ये दिल्ली येथे झालेल्या महात्मा फुले फेलोशीपसाठी भारताचे गव्हर्नर यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी प्रौढ, कुमार, कुमारी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे प्रशिक्षण दिले. तसेच कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी चित्रकला प्रदर्शन भरविणे व स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे. या कामाची दखल घेत त्यांची नेशन प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
2020 मध्ये नेशन प्राईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारतातील नामांकित विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्वांची नोंद झाली असून, नेटके यांच्या या नोंदीमुळे अहमदनगर शहराचे नांव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल टीम टॉपर्सचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे, सचिव सागर भिंगारदिवे, टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीकांत कसाब, कृष्णा अल्हाट, शिल्पा नेटके, संध्या गांधी, किरण माने आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment