नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस हा आहे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस हा आहे

 नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस हा आहेनगरी दवंडी

अहमदनगर, दि. २९-  राज्‍य निवडणुक आयोगाने माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणा-या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशन‍पत्र दाखल करण्‍याचा कालावधी दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 असा आहे. मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करतांना दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळपासुन काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्‍हर अडचण इत्‍यादी तक्रारी आयोगाकडे प्राप्‍त होत आहे. सदर बाब विचारात घेता, इच्‍छुक उमेदवार नामनिर्देशनापासुन वंचित राहु नये आणि त्‍यांना निवडणूक उढविण्‍याची संधी मिळावी म्‍हणुन आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्‍दतीने (offline mode) स्‍वीकारण्‍याचा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याची वेळदेखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्‍याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


तरी सर्व संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी. पारंपारिक पध्‍दतीने नामनिर्देशनपत्र स्‍वीकारणे व वाढीव वेळेच्‍या सुचनांची नोंद घ्यावी. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्‍छुक उमेदवारांना उपलब्‍ध होईल याची व्‍यवस्‍था करावी, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पारंपारिक पध्‍दतीने स्‍वीकारलेले नामनिर्देशनपत्र सं‍बंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्‍या मदतीने, संगणक प्रणालीमध्‍ये आर.ओ. लॉगिन मधुन भरून घेण्‍याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment