जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकारण्याच्या 'बार्टी'च्या सूचना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकारण्याच्या 'बार्टी'च्या सूचना

 जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकारण्याच्या 'बार्टी'च्या सूचनानगरी दवंडी                                                      

अहमदनगर, दि. २९:  निवडणुक विषयक प्रकरणाच्‍या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्‍याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेला असल्‍याने जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची / जात वैधता प्रमाणपत्र प्रस्‍ताव दाखल केलेल्‍या पावतीची आवयश्‍कता असल्‍याने तसेच अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्‍हणुन त्‍याअनुषंगाने 30 डिसेंबर 2020 रोजी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने स्‍वीकारण्‍यात येणार आहेत. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) उपायुक्त तथा प्रकल्प संचालक यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला तशा सूचना दिल्या आहेत.

कोणत्‍याही परिस्थितीत कायदा व सुव्‍यवसथा बिघडणार नाही याची दक्षता घ्‍यावी व आवयश्‍कतेकप्रमाणे पोलिस विभागास संपर्क साधून आवयश्‍क ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्‍यकतेनुसार अर्ज स्‍वीकारण्‍याचे  टेबल / खिडकी वाढवण्‍यात यावी. अर्जदारांची संख्‍या विचारात घेता कार्यालय पूर्ण वेळ तसेच आवश्‍यकतेनुसार सर्व अर्जदारांचे अर्ज स्‍वीकारेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत.ज्‍या अर्जदारांचे ऑफलाईन पध्‍दतीने अर्ज दि‍लेले आहे त्‍यांचे सोबत  उमेदवारांचे नाव, त्यांचा रजिस्टर नंबर व पावती नंबर आदी माहिती दिनांक 1 जानेवारी 2021 रोजीपर्यंत पाठविण्‍यात यावी. कोणत्‍याही प्रकारचे अनियमितता तसेच गैरकृत्‍याबाबत या कार्यालयाकडे तसेच शासनाकडे अर्जदारांची तक्रार होणार नाही याची दक्षता घेऊन नियमाप्रमाण कार्यवाही करण्‍यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment