ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावा ः आ. धस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावा ः आ. धस

 ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावा ः आ. धस

नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः राज्यातील संबंध ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या सोमवारी सुरेश धस यांनी पुणे येथे साखर आयुक्त, शेखर गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा करत कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्र राज्यातील जवळपास 192पेक्षा जास्त साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले असून राज्याच्या विविध भागातून ऊस तोडणी कामगार कारखाना परिसरात आलेले आहेत.साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी राज्य शासनाने व साखर संघाने कारखाना प्रशासनाला गाळपाची परवानगी देण्यापूर्वी कारखाना स्थळावर व परिसरात काम करणार्‍या ऊस तोड व वाहतूकदार कामगार यांना मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.
    राज्यातील 22 साखर कारखान्यांवर भेट दिली असताना बहुतांश कारखान्यांवर कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत असे दिसून आले आहे.यामध्ये महिलांचे सौचालय कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले त्यामुळे मजुरांना उघड्यावर शौच करावी लागते महिलावर्गाची फार मोठी कुचंबणा होत आहे.त्यांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत.दिसत आहे त्यामुळे मजुरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत.तरी संबंधित कारखाना प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरेश धस यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment