जयभगवानच्या महासंघाच्या जिल्हा संघटकपदी लहू दराडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

जयभगवानच्या महासंघाच्या जिल्हा संघटकपदी लहू दराडे

 जयभगवानच्या महासंघाच्या जिल्हा संघटकपदी लहू दराडे

    लोकनेते गोपीनाथ मुंढे सर्व  सामन्याचे नेते होते ,ओबीसीचे   नेते होते. ते गेल्याने ओबीसी समाज हा पोरका झाला आहे ,ते आमच्या सर्वांचे आधार होते ,मी मुंडे साहेबाचा पुतळा खरवंडी कासार येथे उभारणार आहे .व साहेबाच्या पुतळ्याचे थोड्याच दिवसात सुरु करणार आहे
बाळासाहेब  सानप
ओबीसी/व्हि जे एन्टी समितीचे अध्यक्ष


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः जयभगवान  महासंघाचे अध्यक्ष  बाळासाहेब सानप हे भगवानगडावर ओबीसी व्ही -जे  एनटी  जनमोर्चा या बैठकीचे आयोजन केले होते .येत्या 26 तारखेला ओबीसीचा  जिल्हा मेळावा  आयोजन केले आहे. या बैठकीत मालेवाडी गावाचे सामाजिक कारकर्ते लहू दराडे यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती केली आहे
   जय महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी लहू दराडे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे .यावेळी बाळासाहेब सानप म्हणाले कि समाज्यातील वंचित  दुर्लब माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम लहू दराडे यांनी  करावे संघटना त्याच्या पाठीशी आहे व  राहील ,यावेळी लहू दराडे म्हणाले कि मी सर्वे सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करि व त्याच्या अडचणी सोडायचे काम करिन व संघटनेचे नाव उंचावले असे काम करेल. यावेळी तालुकाध्यक्ष प्रल्हाद कीर्तने जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब वाघ, विजय राठोड, अजिनाथ बटुळे ,शिवराज बटुळे ,वामन कीर्तने विवेक बटुळे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment