जिल्हाशिक्षणाधिकार्यांना निसर्गप्रेमी पुरस्काराने निरोप..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

जिल्हाशिक्षणाधिकार्यांना निसर्गप्रेमी पुरस्काराने निरोप..!

 जिल्हाशिक्षणाधिकार्यांना निसर्गप्रेमी पुरस्काराने निरोप..!

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या सहकार्याने मा. श्री.दिनकर टेमकर जिल्हाधिकारी असताना शाळा पातळींवर अनेक जिल्हास्तरीय निसर्गसंवर्धनात्मक उपक्रमांना सुरूवात झाली.या उपक्रमांची परंपरा पुढे मा.श्री.रमाकांत काठमोरे यांनी तशीच सुरू ठेवुन अनेक नवीन जिल्हाव्यापी निसर्गसंवर्धन उपक्रमांचे आयोजन केले.यात जिल्हास्तरीय पक्षीगणना,फुलपाखरांचे सर्वेक्षण,रानफुलांचे सर्वेक्षण,उभयचर प्राणी सर्वेक्षण,बीज बँक,वृक्षारोपण,छायाचिञे प्रदर्शन,निसर्गसहली,राज्यफुलवृक्ष ताम्हण आपल्या दारी उपक्रम अशा कित्येक उपक्रमांमधुन शिक्षक व विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीकता साधली.पुस्तकी ज्ञानातुन बाहेर पडुन या उपक्रमांच्या माध्यमातुन सर्वांना प्रत्यक्ष अनुभव घेता आले.यातील अनेक उपक्रम संपुर्ण राज्याला दिशादर्शक ठरले असुन इतर जिल्ह्यात सुद्धा ते राबविण्यास सूरूवात होत आहे.उपक्रमांमधील वस्तुनिष्ठता टिकुन रहावी म्हणुन या उपक्रमांच्या आयोजनाबाबत कसलेही बंधन शाळेवर ठेवललेे नव्हते,आपल्या आवडी व सवडीने उपक्रमांमध्ये शाळांना सहभागी होण्याची मुभा असल्याने अनेक शाळा,शिक्षक व विद्यार्थ्यांनी यात आनंदाने सहभाग नोंदवला.एवढेच नव्हे तर या कार्याची पावती म्हणुन सर्व सहभागींना प्रत्येक वेळी मान्यवरांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपञही नियोजनबद्धरित्या दिले गेले.                 माजी शिक्षणाधिकारी व सध्या राज्याच्या शिक्षण सहसंचालकपदी असलेल्या मा.दिनकर टेमकर यांनी अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमींच्या सहकार्याने सुरू केलेले हे कार्य शिक्षणउपसंचालक पदी नियुक्त झालेल्या श्री.रमाकांत काठमोरे यांनी वाढविले सध्या जिल्हाशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले मा.श्री.शिवाजी शिंदे यांनीही हे उपक्रम पुढेही असेच वृद्धींगत करण्याबाबत आश्वासन दिले आहे.माजी जिल्हाशिक्षणाधिकारी तथा शिक्षण उपसंचालक मा.श्री.रमाकांत काठमोरे यांना निसर्गप्रेमी संघटनेतर्फे जिल्हा निसर्गप्रेमी पुरस्कार देवुन निरोप दिला गेला.यावेळी शिक्षण सहसंचालक श्री.दिनकर टेमकर व जिल्हा शिक्षणाधिकारी मा.शिवाजी शिंदे याचाही सत्कार संपन्न झाला.जिल्हा निसर्गप्रेमी संघटनेचे निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांसह वनस्पती अभ्यासक श्री.अमित गायकवाड निसर्गप्रेमी श्री.संदिप फंड,संदिप भालेराव,बाळासाहेब चाबुक्स्वार,श्री.डमाळे सर आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment