वंचितांच्या सेवेत नाताळाचा खरा आनंद - डॉ.पठारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

वंचितांच्या सेवेत नाताळाचा खरा आनंद - डॉ.पठारे

 वंचितांच्या सेवेत नाताळाचा खरा आनंद - डॉ.पठारे    

बेघर निवारा गृहामध्ये नाताळ उत्साहात साजरा    


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
अहमदनगर महानगरपालिका व बी.पी.एच.ई. सोसायटीच्या सीएसआरडी इन्स्टिट्युट ऑफ सोशलवर्क अ‍ॅण्ड रिसर्च  संस्थेद्वारे चालविण्यात येत असलेल्या शहरी बेघर निवारा गृहामध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्यासह निवारा गृहाचे व्यवस्थापक सॅम्युअल वाघमारे व नाजीम बागवान उपस्थित होते. निवारा गृहातील निराधार वयोवृद्धनी उत्साहात नाताळ सणाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. बेघर निराधार बाधवांसाठी नाताळा निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रम आनंदाची पर्वणी ठरला. विविध गाणे, खेळ व मनोरंजन कार्यक्रम घेत सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. सीएसआरडी संस्थेकडून देण्यात आलेल्या फराळ व मिठाई आस्वाद घेतला. यावेळेस बी.पी.एच.ई. सोसायटी व आयएमएस संस्थेकडून निराधार वयोवृध्द आजी-आजोबांना थंडीत संरक्षण म्हणून भेट म्हणून देण्यात आलेल्या उबदार कपडे, स्वेटर, कानटोप्या, मफलर्सचे वितरण करण्यात आले, तसेच सीएसआरडीच्या सौ.वैशाली पठारे यांनी महिलांसाठी पाठविलेल्या साड्या मिळाल्याने महिलांचे डोळे पाणावले. आपली कोणी काळजी घेत आहे, प्रेम आपुलकी व माया दाखविल्याबद्दल बेघर बांधवांनी सीएसआरडीचे ऋण व्यक्त केले. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ.  सुरेश पठारे यांना निवारा गृहातील निराधार लाभार्थ्यांनी प्रमाने बनवलेले ग्रिटींग कार्ड भेट देऊन त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात सर्व लाभार्थ्यांकडून एकत्रितपणे नाताळाचा विशेष केक कटिंग करण्यात आले. यावेळेस डॉ. सुरेश पठारे म्हणाले कि, बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू वंचितांच्या उद्धारासाठी या जगात मानवीरूप धारण करून आले होते. त्यांनी आपल्या जीवनकाळात नेहमी निराधार, दु:खी, कष्टी व गरजवंताला आधार देण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रेम, दया, शांती व करुणेच्या शिकवणीवर जगभरातील अनेक संस्था निराधार व वंचितांची  सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. दु:खीतांचे आश्रू पुसणे हाच खरा मानवता धर्म असून वंचितांच्या सेवेत नाताळाचा खरा आनंद आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेघर निवारा गृहातील कर्मचारी लता नाईक, सॅम्युअल नाईक व मयूर बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment