शिवराष्ट्र सेनेच्या ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

शिवराष्ट्र सेनेच्या ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे

 शिवराष्ट्र सेनेच्या ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर - शिवराष्ट्रसेना पक्षाच्या ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे यांची निवड करुन पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आले. यापसंगी जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, राधाकिसन कुलट आदि उपस्थित होते.
      याप्रसंगी संतोष नवसुपे म्हणाले, शिवराष्ट्र सेनेच्यावतीने सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करत आहे. प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व असावे, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी पक्षात सर्वांना सहभागी करुन घेण्यात येत आहेत. सध्या ओबीसी समाजाच्यावतीने विविध प्रश्नांसंदर्भात मोर्चा, आंदोलने, बैठका सुरु आहेत. अशा परिस्थितीत शिवराष्ट्र सेना ओबीसींच्या पाठिशी उभे राहून त्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल. यासाठीच शिवराष्ट्र सेनेच्या ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब करपे यांची नियुक्ती करुन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या या पदाला चांगला न्याय देतील, असा विश्वास संतोष नवसुपे यांनी व्यक्त केला.
     याप्रसंगी बाबासाहेब करपे म्हणाले, शिवराष्ट्र सेनेच्यावतीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठविला आहे. या पक्षात काम करण्यास मोठी संधी असल्याने आपण कार्यरत राहून काम करत आहोत, आता ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन जो विश्वास दाखविला तो सर्वांना बरोबर घेऊन सार्थ ठरवू. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ ओबीसींपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कांबळे यांनी केले तर आभार भैरवनाथ खंडागळे यांनी मानले.  याप्रसंगी  प्रशांत देठे, राजू चावक, अयि म्हस्के, माऊली बाधाडे, नवनाथ नागरगोजे, विवेक डफळ, धनंजय डोके, अनुप गांधी, ऋषी शिंदे, निलेश जायभाय, विजय जगताप, अजय अपुर्वा, अनिकेत पवार, ओमकार जाधव, साहिल सोनटक्के आदिं उपस्थित होते.

No comments:

Post a Comment