समाजवादी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

समाजवादी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

 समाजवादी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः  सर्वसामान्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी प्रस्थापितांविरोधात बंड करण्यासाठी समाजवादी पार्टीने पुढाकार घेतला आहे. अहमदनगरमध्ये घराणेशाही व प्रस्थापितांच्या राजकीय भांडणात शहराचा विकास खुंटला. विकासाला चालना देण्यासाठी व सत्ता सर्वसामान्यांच्या हाती देण्याकरिता समाजवादी पार्टी एक सर्वोत्तम पर्याय म्हणून पुढे आली आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव जुल्फिकार अहमद आजमी यांनी केले.
    समाजवादी पार्टी अहमदनगरच्या वतीने गुलमोहर रोड येथील गुलमोहर प्राईड मध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुल्फिकार आजमी बोलत होते. याप्रसंगी समाजवादीचे जिल्हाध्यक्ष आजीम राजे, मोहंमद हुसेन, मोबीन सय्यद, परवेज खान, दिशान शेख, गौस शेख, समीर खान, फारुक बागवान, फिरोज शेख, राजू जहागीरदार, जीना शेख आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे प्रदेश महासचिव आजमी म्हणाले की, येणार्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी सर्व जागा लढवून आपले असतित्व सिध्द करणार आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकार्यांनी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
    या मेळाव्यात महिला जिल्हाध्यक्षपदी बिस्मिल्लाह शेख, वहातुक जिल्हाध्यक्षपदी हुसेन शेख (मुन्ना भाई), जिल्हा उपाध्यक्षपदी जहीर सय्यद, शहर उपाध्यक्षपदी शफी बने खान, वहातुक जिल्हा उपाध्यक्षपदी  नादिर सय्यद, जावेद खान, हाजी फारुख कासम व वहातुक शहर अध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष तौसीफ शेख, दिनेश गायकवाड, शेख आमिन गफूर या पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश महासचिव आजमी यांनी नुतन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. 

No comments:

Post a Comment