प्रत्येक राज्याला राज्य रेल्वेमंत्री देण्याची पिपल्स हेल्पलाईनची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

प्रत्येक राज्याला राज्य रेल्वेमंत्री देण्याची पिपल्स हेल्पलाईनची मागणी

 प्रत्येक राज्याला राज्य रेल्वेमंत्री देण्याची पिपल्स हेल्पलाईनची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  पुण्याच्या धर्तीवर अहमदनगरचा विकास साधण्यासाठी नगर-पुणे खाजगी लोकल रेल्वे सुरु होण्याकरिता मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद व पिपल्स हेल्पलाईन आग्रही असून, याचा पुढील पाठपुरावा करण्यासाठी रविवार दि.27 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारकात बैठक बोलविण्यात आली आहे. तर देशाच्या प्रत्येक राज्यातील शहरे रेल्वेने एकमेकाला जोडण्यासाठी प्रत्येक राज्याला राज्य रेल्वेमंत्री देण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
     तसेच नगरच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वाची भूमिका घेणार्या उद्योजक हरजितसिंह वधवा यांना रेल्वे लॉरिस्टरचा सन्मान देण्यात येणार आहे. देशातील अनेक राज्ये इतर देशांच्या तुलनेत क्षेत्रफळ व लोकसंख्यांच्या प्रमाणात मोठे आहे. एकटे केंद्रीय रेल्वेमंत्री संपुर्ण देशात रेल्वेचे जाळे पसरविण्यासाठी कमी पडत आहे. प्रत्येक राज्यात राज्य रेल्वेमंत्रीची नियुक्ती झाल्यास त्या राज्याची रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी व त्यामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करुन प्रश्न सोडविणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
     नगर-पुणे खाजगी लोकल रेल्वे सुरु झाल्यास नगर शहराचा झपाट्याने विकास होणार आहे. नगर सोडून त्यालगत असलेल्या शहरांचा झपाट्याने विकास झाला. मात्र नगर शहराचा विकास दोन दशकापासून खुंटला आहे. या लोकल रेल्वेने नगर येथील उद्योगधंद्यांना चालना मिळून पुण्यात देखील नगरच्या युवकांना रोजगार सहज प्राप्त होणार आहे. तसेच शहरातील वकिलांना पुणे येथे जाऊन न्यायालयात कामकाज करुन तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन परत नगरला येता येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment