ना.विजय वडेट्टीवार यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

ना.विजय वडेट्टीवार यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट

 ना.विजय वडेट्टीवार यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगरमध्ये आल्यावर अनेकांकडून नगरच्या जागृत देवस्थानाबद्दल ऐकून होता. आज या ठिकाणी दर्शनाचा योग आला. भव्य श्री गणेशाची मुर्ती व आकर्षक मंदिरामुळे अगदी प्रसन्न वाटते. प्रत्येक शहराची ओळख ही तेथील ग्रामदैवतेमुळे होत असते. मंदिराच्यावतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे. या देवस्थानच्या विकाससाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करु. त्यातून मंदिर परिसर आणखी सुशोभित होऊन भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास ना. विजय वडेट्टवार यांनी भेट दिली असता, त्यांचा देवस्थानच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, तुषार पोटे, हरिभाऊ डोळसे, अर्जुन बोरुडे, आनंद लहामगे, श्याम व्यवहारे, शिल्पा दुसुंगे आदि उपस्थित होते. यावेळी ना.वडेट्टीवार यांच्या हस्ते पुजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर यांनी मंदिराच्या विविधि उपक्रमांची व झालेल्या जिर्णोद्धार कामाची माहिती ना. वडेट्टीवार यांना दिली. या देवस्थानचा तिर्थक्षेत्र विकास योजनेतून विकास व्हावा. त्यातून भाविकांना आणखी सुविधा देताल. यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.  

No comments:

Post a Comment