ना.विजय वडेट्टीवार यांना फुले ब्रिगेडच्यावतीने निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

ना.विजय वडेट्टीवार यांना फुले ब्रिगेडच्यावतीने निवेदन

 ना.विजय वडेट्टीवार यांना फुले ब्रिगेडच्यावतीने निवेदन

ओबीसी लढ्यात सक्रिय सहभाग देऊ - दिपक खेडकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः बहुजन विकास व मदत पुनवर्सन मंत्री ना.विजय वडेट्टीवार नगरमध्ये ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चासाठी आले असता त्यांचे स्वागत करुन ओबीसीच्या प्रश्नांबाबतचे निवेदन फुले ब्रिगेडच्यावतीने शहराध्यक्ष दिपक खेडकर यांनी दिले. याप्रसंगी सारंग पंधाडे, किरण जावळे, प्रसाद बनकर, प्रसाद शिंदे, मळू गाडळकर, योगेश भुजबळ, संतोष हजारे, जालिंदर बोरुडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी दिपक खेडकर म्हणाले, अनेक वर्षांपासून ओबीसी अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी ना.विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या हक्कासाठी सुरु केलेल्या लढात आम्ही सक्रीय सहभाग देऊ. आज ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, उद्योजकांचे प्रश्न प्रलंबित असून, त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणासाठी 1965 व त्या आधीच्या जातीचे दाखले ग्राह्य धरावे,त्याच बरोबर 370 पेक्षा अधिक जातीमध्ये समन्वय घडून आणणे आणि ओबीसीची वज्रमुठ अधिक बळकट करणे. त्याचबरोबर ओबीसीची संघटन कायम करणे आदिंसाठी आम्ही आपणाबरोबर राहू, असे सांगितले. यावेळी ना.विजय वडेट्टीवार यांनी संघटनेच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. ओबीसींच्या प्रश्न सोडविण्याबाबत आपणही अग्रही असून, शासनाच्यावतीने ओबीसींसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी संघटनेने प्रयत्न करावेत. तसेच ओबीसींचे मजबूत संघटन करावे, असे आवाहन केले.      

No comments:

Post a Comment