पुणे ते मुंबई सायकल रॅली आठ तासात केली पूर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

पुणे ते मुंबई सायकल रॅली आठ तासात केली पूर्ण

 पुणे ते मुंबई सायकल रॅली आठ तासात केली पूर्ण 

वाढदिवसानिमित्त दिला आरोग्यवर्धन व प्रतिकारशक्ती वाढविण्याचा कृतीयुक्त संदेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  करोनाकाळात प्रत्येक जण आरोग्याबाबत अधिक सजग झाला आहे. रोगप्रतिकारशक्तीच कुठल्याही आजारात आपला बचाव करू शकते हे सर्वांनाच कळून चुकले आहे. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पुण्यातील स्वानंद ऍडव्हेंचर्सचे संस्थापक संजीव शहा आणि सिध्दांत छाजेड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुणे ते मुंबई या आरोग्याचा संदेश देणार्या सायकल रॅलीचे आयोजन केले. आठ तासात सुमारे दीडशे किलोमीटर अंतर पार करीत सायकलपटूंनी सायकलिंगव्दारे प्रतिकारशक्ती वाढवा आणि फिट रहा असा संदेश दिला. या सायकल रॅलीत संजीव शहा, सिध्दांत छाजेड, सुधीर गायकवाड, ओम जगताप, वरूण पितळीया, सिध्दांत पितळीया, साहील शहा, नितीन चितोडकर, रिषभ शाह, साधना शाह, स्मृती शाह, तुषार राठोड, संदीप बंब, जिनेश जैन सहभागी झाले होते. समिक्षा छाजेड यांनी सायकलपटूंबरोबरच पुणे ते मुंबई असा प्रवास करून सर्वांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. रॅनेकल सायकलीच्या टिमने बॅक अप सपोर्ट केला तर तन्मय बोरा यांनी संपूर्ण राईडचे सुरेख चित्रीकरण केले. ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांनी सायकल राईडला हिरवा झेंडा दाखवला. फडणीस म्हणाले की, व्यायाम हा निरोगी जीवनाचा खरा मंत्र आहे. सायकलिंगमुळे शरीर व मन अधिक बळकट होते. शहा आणि छाजेड यांनी वाढदिवस साजरा करताना सायकलिंग करण्याचा संदेश देवून सामाजिक दायित्त्व निभावले आहे. या सायकल रॅलीत 18 ते 58 वर्षे वयोगटातील सायकलपटू सहभागी झाले होते. 58 वर्षाचे संजीव शहा म्हणाले की, सायकलिंगमुळे अनेक आजारांवर मात करण्याची शक्ती तयार होते तसेच अनेक आजार आपण दूर ठेवू शकतो. पुणे ते मुंबई प्रवासात आरोग्यवर्धनाबाबत जागृती करणारी पत्रके वाटण्यात आली. रॅलीत तरुणाईचा सहभाग उल्लेखनीय होता. त्यांच्या माध्यमातूनच निरोगी आयुष्यासाठी सायकलिंग किती महत्त्वाची आहे, याचा प्रसार भविष्यात होईल. सिध्दांत छाजेड म्हणाले की, प्रत्येक वाढदिवसाला आपण असा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदा पुणे ते मुंबई सायकल रॅलीची संकल्पना सुचली व सगळ्यांच्या प्रतिसादामुळे ती यशस्वीही झाली. याव्दारे समाजात आरोग्याप्रती जागृतीची चांगली प्रेरणा निश्चित जाईल, असा विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment