तरुण अभियंत्यांना संजीव घोडके यांचे कार्य प्रेरक ः पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

तरुण अभियंत्यांना संजीव घोडके यांचे कार्य प्रेरक ः पवार

 तरुण अभियंत्यांना संजीव घोडके यांचे कार्य प्रेरक ः पवार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या कामाकडे सेवा म्हणून लक्ष दिले तरी ते काम चांगले होते. शिक्षक हा काम करतांना ज्ञानदानाचे महत्वाचे काम करतो, तसे शासकीय कार्यालयातील अधिकारी हे देखील सार्वजनिक सेवा तत्परतेने, सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक वागणूक देऊन आपले काम चोखपणे पार पाडतात. आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील संजीव घोडके यांनी देखील 30 वर्षांच्या कार्यकाळात नवीन तरुण अभियंत्यांना मार्गदर्शक व प्रेरणा देणारे असे काम करुन आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी केले.
    अहमदनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील मार्गप्रकल्प विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता संजीव संभाजी घोडके हे सेवानिवृत्त झाले, त्याबद्दल कार्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.पवार बोलत होते. याप्रसंगी रो.ह.यो.कार्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण, उपकार्यकारी अभियंता ए.बी.बडे, राकेश सयाम, सहाय्यक अधिक्षक अभियंता आनंद मेहेत्रे, उपअभियंता नंदकिशोर मिसाळ, नेवासा येथील उपअभियंता महेंद्र बनसोडे आदि उपस्थित होते.
    श्री.पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुमारे 150 वर्षाहून जास्त अशी गौरवशाली परंपरा असलेला महत्वाचा विभाग आहे, अशा या विभागात आपल्याला काम करण्याची संधी मिळावी हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
    यावेळी सत्काराला उत्तर देतांना संजय घोडके म्हणाले की, 30 वर्षे सेवा पूर्ण केली ही करतांना सामाजिक प्रश्न सहानुभुतीपूर्वक सोडविण्याचा दृष्टीकोन ठेवून पूर्णपणे सोडविले याचे समाधान वाटते. मार्ग प्रकल्प विभागातील कामात रस्ते विकास योजनेतील कामे मार्गी लावले. सेवा देतांना उत्तम दर्जा व सुरक्षितेला महत्व दिले. वरिष्ठांचे मागदर्शन, स्टाफचे सहकार्य मिळाल्याने मी चांगले काम केले याचे खरे समाधान वाटते, असे म्हणाले.
    यावेळी संजीव घोडके यांच्या कामाबद्दल सर्वांनी आपल्या भाषणात गौरव केला. शेवटी घोडके परिवाराच्यावतीने आभार मानले.

No comments:

Post a Comment