जाणून घ्या कोरोणाचे आजचे अपडेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

जाणून घ्या कोरोणाचे आजचे अपडेट

 जाणून घ्या कोरोणाचे आजचे अपडेट



नगरी दवंडी


अहमदनगर जिल्ह्यात आज १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर तेवढ्याच संख्येची भर रुग्ण संख्येत पडली.आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार २८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे.दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४० ने वाढ झाल्याने सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२२७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४३ आणि अँटीजेन चाचणीत ३७ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले ०५, कर्जत ०३, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०१, पारनेर ०३, पाथर्डी ०५, राहाता ०२, संगमनेर ०४, शेवगाव ०५,श्रीगोंदा ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०४, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले ०२,कर्जत ०१, कोपरगाव ०३,पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहाता १०, संगमनेर ०७, श्रींगोंदा ०१, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३७ जण बाधित आढळुन आले.यामध्ये, मनपा ०४, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपर गाव ०१, नेवासा ०२, पाथर्डी ११, राहाता ०१, राहुरी ०१, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१,अकोले ०२, जामखेड ०५, कर्जत १३, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०३ , पारनेर ०८,पाथर्डी ०८, राहाता १८, राहुरी ०५, संगमनेर २०, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:६५२८९ उपचार सुरू असलेले रूग्ण: १२२७ मृत्यू:१०१५ एकूण रूग्ण संख्या:६७५३१

No comments:

Post a Comment