अनाथ मुलांच्या पंगतीने होणार दत्त जयंती महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

अनाथ मुलांच्या पंगतीने होणार दत्त जयंती महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ

 अनाथ मुलांच्या पंगतीने होणार दत्त जयंती महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ

गरजूंना सायकल वाटप, रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर

श्री सूर्यमुखी गुरूदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम प्रेरणादायी - एन. बी. धुमाळ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः गरजवंताची मदत करणे ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचे प्रत्येकाने अनुकरण केल्यास आपल्यातील खारीचा वाटा गरजवंतास दिल्यास काही अंशी इतरांची गरज पूर्ण होण्यास मदत होईल. याचा प्रत्यय आज या ठिकाणी आला. तरुणांनी एकत्र येऊन गरजू मुलांना सायकलींची भेट दिली. श्री सूर्यमुखी गुरूदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या श्री दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त या उपक्रमाबरोबरच रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले व गरजूंसाठी नेत्रदान तपासणीही करण्यात आली. सामाजिक भावनेतून राबविण्यात आलेले हे सर्वच उपक्रम खर्या अर्थाने प्रेरणा देणारे आहेत, असे प्रतिपादन हॉटेल सुवर्णम् प्राईडचे संचालक एन. बी. धुमाळ यांनी केले. दातरंगे मळा येथील श्री सूर्यमुखी गुरूदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या वतीने श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी हॉटेल सुवर्णम् प्राईडचे संचालक एन. बी. धुमाळ यांच्या हस्ते गरजूंना नवीन सायकलींचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जात असून, हे 18वे वर्ष आहे. रक्तदान शिबिरासाठी आनंदऋषी रक्तपेढीचे डॉ. महानोर व नेत्र तपासणीसाठी डॉ. मोरे यांचे सहकार्य लाभले. श्री. धुमाळ पुढे म्हणाले की, रक्तदान शिबिरे सद्य कोरोनाकाळात कमी झाल्याने रक्ताची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली. रक्ताचा मोठा तुटवडा भासू लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात सुमारे 107 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याबरोबरच 55 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने रक्तदानाचा हक्क बजवावा. दातरंगे मळा येथील श्री सूर्यमुखी गुरूदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट) सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर राहिले आहे. तरुणांच्या समुहाने एकत्रित येऊन कोरोना संकट काळात ट्रस्टच्या माध्यमातून भरीव काम केले, असे ते म्हणाले. मंगळवार, दि. 29 डिसेंबर 2020 रोजी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त दातरंगे मळा येथील श्री सूर्यमुखी गुरूदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाईल. अनाथ मुलांच्या पंगतीने महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ होईल, असे ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.  दातरंगे मळा येथील श्री सूर्यमुखी गुरूदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या वतीने श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी हॉटेल सुवर्णम् प्राईडचे संचालक एन. बी. धुमाळ यांच्या हस्ते गरजूंना नवीन सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी आनंदऋषी रक्तपेढीचे डॉ. महानोर, नेत्र विभागाचे डॉ. मोरे यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment