महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मंगळवारी बैठक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मंगळवारी बैठक.

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मंगळवारी बैठक.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर दक्षिण विभागाच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी मंगळवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 2 वा. राष्ट्रीय पाठशाळा हायस्कुल परिसर, यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहासमोर, स्टेशन रोड अहमदनगर येथे पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या सुचनेवरून राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रविण सपकाळे हे या बैठकीस निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील सुचनेनुसार अहमदनगर दक्षिण मधील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी व शेवगाव या 7 तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची वार्षिक सभासद फी 500 रुपये असून जिल्हा व तालुका स्तरावर सहभागी होऊ इच्छिणारा पत्रकार हा दैनिक, साप्ताहिक, लोकल न्यूज चॅनल, यु ट्यूब चॅनेल, प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करणारा असावा. पासपोर्ट साईज फोटो, आपले नाव, गाव, तालुका, दैनिकाचे नाव, मोबाईल नंबर व इमेल आयडीसह  माहिती ीर्रीींललसारळश्र.लेा या मेलवर पाठवावी. जिल्हा व तालुका कार्यकारिणी रचना पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे :-  जिल्हाध्यक्ष - 1, कार्याध्यक्ष - 1, उपाध्यक्ष - 2, सचिव - 1, सहसचिव - 1, कोषाध्यक्ष - 1, सहकोषाध्यक्ष - 1, जेष्ठ सल्लागार/ मार्गदर्शक - 2, व इतर सर्व सदस्य अशी कार्यकारिणीची रचना असणार आहे, सभासद नोंदणी, सभासद फी, सभासद ओळखपत्र ही कामे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. त्यासाठी लवकरच एक अँप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.   

No comments:

Post a Comment