कोरोना वाढीव बिलाबाबत खाजगी रुग्णालये उदासीन.. पुन्हा आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

कोरोना वाढीव बिलाबाबत खाजगी रुग्णालये उदासीन.. पुन्हा आंदोलन.

 कोरोना वाढीव बिलाबाबत खाजगी रुग्णालये उदासीन.. पुन्हा आंदोलन.


नगरी दवंडी प्रतिनिधी

अहमदनगर ः कोरोणा रुग्णांना लुटणार्‍या 13 हॉस्पिटलांना मनपा प्रशासनाने 48 लाख रुपये पुन्हा रुग्णांना परत देण्याचे आदेश असताना या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. 2 महिन्यात फक्त 3 हॉस्पिटलांनी फक्त 1 लाख 71 हजार रुग्णांना परत केले आहेत.
      आयुक्त व मनपा प्रशासन या हॉस्पिटलला पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ बुधवार दि. 23 डिसेंबर रोजी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात नितीन भुतरे यांनी म्हटले आहे की जवळपास 47 लाख रुपये रुग्णांना परत करण्याचे असतांना देखील खाजगी हॉस्पिटल वाल्यांनी  उपजिल्हा  अधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांच्या आदेशला केराची टोपली दाखवली ईतके दिवस उलटून देखील महानगर पालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसुन आल्यामुळे हॉस्पिटल चालकांना महानगर पालिकेचे आयुक्त व संबधित पदाधिकारी पाठीशी घघालतांना दिसत आहे.त्यामुळे  रुग्णांना वाढीव बिलाची रक्कम परत मिळावी व जे हॉस्पिटल वाढीव बिलाची रक्कम परत करनार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने 23 डिसेंबर रोजी मोठे अंदोलन महानगर पालिकेत व संबधित अधिकार्यांच्या विरोधात करण्यात येणार असुन ज्या रुग्णांची वाढीव बिलाची रक्कम परत मिळली नाही  अश्या लोकांनी, नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे.
     या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,मनोज राऊत,शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर,अ‍ॅड अनिता दिगे, तसेच शहरातील व तालुक्यातीलसर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत राहणार आहेत असा ईशारा मनसे च्या वतीने नितीन भुतारे यांनी  या पत्रकाद्वारे महानगर पलिकेला दिला आहे.

No comments:

Post a Comment