शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यास लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यास लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

 शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यास लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड


नगरी दवंडी प्रतिनिधी

अहमदनगर ः दुकानातील रोख रक्कम बॅगेतून घेऊन चाललेल्या व्यापार्‍याचा धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याचे जवळील रोख रक्कम, टॅब, मोबाईल असा एकूण चार लाख 98 हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल लुटणार्‍या चार गुन्हेगारांच्या प्रमुख टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले असून चोरी गेलेल्या रोख रकमेतील 86 हजार पाचशे रुपये हस्तगत केले आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की दिलीप शंकर गौड वय 35 धंदा व्यापार रा. निवारा कोपरगाव जि अहमदनगर यांचे किशोर वाईन्स दुकानातील रोख रक्कम बॅगे मधून घेऊन अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरून घरी जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चार इसमांनी फिर्यादीच्या गाडीला लाथ मारून त्याला खाली  पाडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी जवळील रोख रक्कम, मोबाईल, टॅब असा एकूण चार लाख 98 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि श्री अनिल खटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने तपास करत असताना कटके यांना हा गुन्हा सोमनाथ गोपाळ रा.वाघ वस्ती ,शिर्डी याने व त्याचे साथीदारांनी केले असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली.
पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख, गणेश इंगळे ,मोहन गाजरे, बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे ,दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, संतोष लोंढे, दीपक शिंदे, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, राहुल सोळुंके, प्रकाश जाधव, रवींद्र घुंगासे, प्रकाश वाघ, योगेश सातपुते, सागर सुलाने, विजय धनेधर, मयूर गायकवाड, संदीप चव्हाण, जालिंदर माने, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांनी शिर्डी येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोमनाथ गोपाळ यास ताब्यात घेतले. त्याचेकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साक्षीदार गणेश चव्हाण, राहुल गोडगे ,रविंद्र तुपे, सिध्दार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांनी मिळून केला असल्याची कबुली दिल्याने या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत केले आहे. सिद्धार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही.
    ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी 86 हजार पाचशे रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे आरोपींना मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे. पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वी संगमनेर, जळगाव, पाचोरा इत्यादी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
    ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, दिपाली काळे मॅडम पोलीस अधीक्षक अहमदनगर , संजय सातव उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment