या शहरातील मटका जुगार व ताडी केंद्रावर पोलीसांचे छापे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

या शहरातील मटका जुगार व ताडी केंद्रावर पोलीसांचे छापे

 या शहरातील मटका जुगार व ताडी केंद्रावर पोलीसांचे छापे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड शहरातील विविध ठिकाणी पोलीसांचे मटका व ताडी केंद्र वर पोलीसांनी कारवाई केली आहे. जामखेड शहरातील अवैध्य धंदे पुर्ण पणे बंद करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी सांगितले.
    आज दिनांक 19/12/2020 रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुप्त बातमीदार मार्फत मिळाली की जामखेड शहरातील बाजार तळ येथे अवैध्य रित्या ताडी विक्री चालू आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याचे वर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने पो. हे. कॉ. संजय लाटे यांना दिल्याने तसेच त्यांच्या वर छापा घालून कारवाई करण्यात आली. ताडी गुत्ता चालवणारा  कैलास शाहूराव पवार वय 48 रा. महादेव मंदिर जवळ जामखेड यास ताब्यात घेतले. सदर ठिकाणी सुमारे 4080/रु.किंमतीची ताडी मिळुन असल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणुन त्याचे विरोध गुन्हा दाखल करण्यात आले.
     पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापू गव्हाणे हे करीत आहे. तसेच जामखेड शहरातील बाजारतळ येथे दोन ठिकाणी अवैध्य रित्या कल्याण मटका नावाचा जुगार चालू आहे अशी माहिती मिळाल्याने त्याचेवर पो. ना. रमेश फुलमाळी या ठिकाणी छापा घालून कारवाई करून कल्याण मटका चालवणारे सचिन मुरलीधर पवार रा.तपनेश्वर जामखेड रोड राजेंद्र नामदेव शिंदे रा. सदाफुले वस्ती तसेच यांना ताब्यात घेऊन धंदा चालवणारे गणेश खेडकर रा. कोर्ट गल्ली जामखेड, दिपक खेडकर रा. जामखेड विरोध जामखेड पोलीस स्टेशनला दोन स्वतंत्र फिर्यादी वरून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात एकूण 4300/-रू. किंमती चे मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जमा करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ना. रमेश फुलमाळी हे करीत आहे.सदरची कारवाई हि मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. संजय लटे, रमेश फुलमाळी, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अविनाश ढेरे, संदीप आजबे, विजय कोळी, संदीप राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment