पानेगाव येथील विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

पानेगाव येथील विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

 पानेगाव येथील विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः पानेगाव ता.नेवासा येथे घरातील स्वच्छतागृहात शौचास जात असलेल्या एका महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न करत दमदाटी केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की पानेगाव येथे राहत्या घरात बाथरूम  समोर येत एका महिलेचा हात पकडून तुला जर  इथे रहायचे असेल तर मी सांगतो तसे कर म्हणत माझ्याशी संबंध ठेव म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची फिर्याद दाखल झाल्यानुसार ज्ञानेश्वर सूर्यभान खडके ,सविता ज्ञानेश्वर खडके व रामचंद्र ज्ञानेश्वर खडके  यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment