30 डिसेंबरचा समता परिषदेचा मोर्चा स्थगित.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

30 डिसेंबरचा समता परिषदेचा मोर्चा स्थगित..

 30 डिसेंबरचा समता परिषदेचा मोर्चा स्थगित..

नगरी दवंडी प्रतिनिधी
अहमदनगर ः
मराठा समाजाला आरक्षण देतांना विचार होतांना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यभरात ओबीसींचे होणारे मोर्चे स्थगित करावेत, अशी आवाहन मंत्री ना.छगनराव भुजबळ यांनी केले असल्याचे दि.30 रोजीचा मोर्चा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिली.
     याबाबत समता परिषदेचे संस्थापक तथा अन्न व पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांची मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याशी  विविध विषयांवर झालेल्या चर्चेनुसार ओबीसी आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट झाली आहे. त्यामुळे राज्यातील पुढील आंदोलने स्थगित करण्यात आले असल्याचे महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी खासदार समीर भुजबळ, माजी आ.पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी जाहीर केले आहे.ओबीसींच्या आंदोलनासाठी नगर येथे नुकतीच राज्य सरचिटणीस अंबादास गारुडकर, पश्चिम विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, जि.प.सदस्य शरद झोडगे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर,माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रा.माणिकराव विधाते, अनिल बोरुडे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन दि.30 रोजीच्या आंदोलनाची तयार सुरु करुन त्यांचे नियोजनही केले होते.
     लोकसंख्येच्या प्रमाणात महाज्योती या संस्थेकरिता 250 कोटी इतका निधी देण्यात यावा. राज्य मागासवर्गीय आयोगावर प्रवर्गातीलच व्यक्तीची नेमणुक करावी, न्यायालयाच्या आधिन राहून अधिकारी व कर्मचार्यांना पदोन्नत्ती देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 3000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा. इतर मागासवर्गीय महामंडळाकरीता वाढीव निधी द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरु करण्यात यावे. घरकुल योजना राबवावी, स्वतंत्र्य जनगणना, अनुषेशातील पदे भरण्यात यावीत.मराठा समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करु नये, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता.
     यावेळी संजय लोंढे, राम पानमळकर, मयुर ताठे, गणेश नन्नवरे, महेश झोडगे, गणेश बनकर, दिपक झोडगे, निखिल शेलार, दिपक खेडकर, अशोक तुपे, जालिंदर बोरुडे, पिंटू गायकवाड, अशोक दहिफळे, काका शेळके, गिरिष जाधव, सचिन गुलदगड, अमित खामकर, अजय औसरकर, विष्णू फुलसौंदर, हरिभाऊ डोळसे, परेश लोखंडे, दिपक कावळे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment